यूएस ओपनमध्ये पेस-स्टेपनेकनं पटकावलं जेतेपद

यूएस ओपनमध्ये पेस-स्टेपनेकनं पटकावलं जेतेपद

  • Share this:

paes-stepanek09 सप्टेंबर : यूएस ओपन मेन्स डबलमध्ये पुरुषांच्या दुहेरी गटात फायनलमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि झेकोस्लावाकियाचा राडेक स्टेपनेक या जोडीनं पराक्रम गाजवला. फायनलमध्ये पेया आणि सोरेस जोडीला हरवून विजेतेपद पटकावलं.

त्यांनी अलेक्झांडर पेया आणि ब्रुनो सोरेस या दुसर्‍या सीडेड जोडीला सरळ सेटमध्ये 6-1, 6-3 असं हरवलं. अगदी एकतर्फी झालेला हा सामना चौथ्या सीडेड लिएंडर आणि स्टेपानेक या जोडीनं अवघ्या 72 मिनिटांमध्ये खिशात घातला.

अक्षरशः 23 मिनिटांमध्ये पहिला सेट जिंकत पेस-स्टेपनेक जोडीनं आपल्या खेळाचा आवेग दाखवून दिला. चाळिशी पार केल्यानंतर ग्रँड स्लॅम जिंकलेल्या काही मोजक्या टेनिसपटूंमध्ये आता लिएंडरचा समावेश झालाय.

लिएंडरचे वडील आणि माजी ऑलिंपिकपटू व्हेस पेस यांनी लिएंडरच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलंय. ते म्हणतात, "हा लिएंडरसाठी मोठा विजय आहे. आम्ही तो साजरा करतोय. ब्रायन बंधूंविरोधात मिळवलेल्या विजयामुळे त्यांना यशाचे दरवाजे खुले झाले. ते चांगले खेळले, ग्रँड स्लॅममध्ये कोणताही गेम सोपा नसतो."

First published: September 9, 2013, 3:40 PM IST

ताज्या बातम्या