News18 Lokmat

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी संघाची तयारी पूर्ण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2013 10:07 PM IST

gujrat narendra modi07 सप्टेंबर : भाजपमध्ये मोठ्या धुमश्चक्रीनंतर भाजपचे प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची पूर्ण तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली आहे. गेले दोन दिवस संघाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यात मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

 

संरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी आणि इतर नेत्यांनी लालकृष्ण अडवाणींशीही चर्चा केली आणि त्यांना आपलं मत सांगितलं. संघासह परिवारातील सर्वच संघटनांच्या नेत्यांनी मोदींना पसंती दिल्याचं भाजपला संघानं सांगितल्याची माहितीही सूत्रांनी दिली. आता पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केव्हा करायची त्याचा निर्णय भाजपनं घ्यावा असंही संघानं भाजपला सांगितलंय.

 

संघ परिवारातील मोदी समर्थक मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी सातत्याने लॉबिंग करत आहेत. याचा भाग म्हणून दिल्लीमध्ये गेला आठवडाभर अनेक गुप्त बैठका पार पडल्यात. गुरूवारी मोहन भागवत यांनी लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. पण निवडणुकीच्या आधी असा कुठलाही निर्णय घेऊ नये हे आपलं मत पुन्हा एकदा अडवाणींनी भागवतांना एकवलंय.

Loading...

 

तर मोदी समर्थकांनी मात्र पाच राज्यातल्या निवडणुका घोषित होण्याअगोदर निर्णय घ्या असा दबाव संघनेतृत्त्वावर आणलाय. अखेरीस नेहमीप्रमाणे संघाच्या निर्णयापुढे भाजपला नमते घ्यावे लागले. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी संघपरिवारातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होतेय. या बैठकीनंतर भाजपकडून मोदींच्या घोषणेची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2013 09:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...