08 फेब्रुवारी, जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे दमानिया यांना केव्हाही अटक होऊ शकते. दमानियांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विविध आरोप केले होते. त्या प्रकरणी खडसेंनी दमानियांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केलाय.. या खटल्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी दमानियांना समन्स बजावण्यात आलं होतं.. मात्र त्या न्यायालयात गैरहजर राहिल्या.. त्यामुळे दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.
एकनाथ खडसे यांच्या जावायाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, बेहिशेबी संपत्ती गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण अशा विविध प्रकरणी अंजली दमानिया यांनी जळगावात येवून बेछूट आरोप केले होते. याच आरोपांविरोधात भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला दमानिया यांच्यावर दाखल केला होता.
या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर होत नव्हत्या. म्हणून आज अखेर त्यांच्या विरोधात न्यायाधिशांनी पकड वॉरंट काढले. या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड. चंद्रजित पाटील व ॲड. तुषार माळी काम पाहत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा