शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान, कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरात तब्बल 9000 जनावरांचा मृत्यू

शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान, कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरात तब्बल 9000 जनावरांचा मृत्यू

शेतकऱ्यांचं हे नुकसान लक्षात घेत या दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना गाई आणि म्हशी दान देण्याससाठी भोसरीकर पुढे सरसावले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 26 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये महापुराने थैमान घातलं. यात संपूर्ण नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या महापुरात तब्बल 9000 जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या जनावरांमध्ये बहुतांश जनावर दुभती आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी हे सर्वात मोठं नुकसान आहे.

शेतकऱ्यांचं हे नुकसान लक्षात घेत या दोन्ही जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना गाई आणि म्हशी दान देण्याससाठी भोसरीकर पुढे सरसावले आहेत. पुरगस्त शेतकऱ्यांना 300 गाई म्हशींचं वाटप केलं जाणार असून त्यातील पहिल्या टप्प्यातील गाई आणि वासरांचं दान करण्यात आलं आहे. या विशेष मदतीमुळे दोन्ही जिल्ह्यातील दूध विक्रेते असल्याने या दुभत्या गाईकडून मिळणार दूध ते विकू शकतील. ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतूक केलं जातं आहे.

तर तिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चिमूर-ब्रम्हपुरी-सिंदेवाही-नागभीड या तालुक्यात पावसाने कहर केला आहे. चिमूरच्या चिखलापार या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा घातला आहे. उमा नदीच्या पाण्यात जवळपास 200 ग्रामस्थ अडकले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाऊस सध्या मंदावला  असला तरी प्रशासनाने या लोकांना गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या - रानू यांना प्रसिद्धी पेक्षाही मिळालं मोठं गिफ्ट, 10 वर्षानंतर परतली मुलगी

छगन भुजबळांच्या पक्ष प्रवेशावर शिवसैनिकांचा विरोध, पण...!

जिल्हा आपत्ती निवारण पथकाने गावात बचाव कार्य सुरू केले आहे. परिसरातील सहकारी राईस मिल आवारात ग्रामस्थांसाठी तात्पुरता निवारा उभारला गेला आहे. चिमूर तालुक्यात गेल्या 24 तासात 72 मिमी तर ब्रम्हपुरी तालुक्यात 76 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 75 टक्के पाऊस आतापर्यंत पडला असल्याची नोंद झाली आहे. आपत्तीग्रस्त भागाकडे प्रशासन नजर ठेवून आहे.

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या