लग्नाआधीच गरोदर राहिली गर्लफ्रेंड, अर्जुन रामपालने दिली ही प्रतिक्रिया

लग्नाआधीच गरोदर राहिली गर्लफ्रेंड, अर्जुन रामपालने दिली ही प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने इन्स्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंड Gabriella Demetriade सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती गरोदर असल्याचं स्पष्ट दिसतं.

  • Share this:

मुंबई, २४ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने इन्स्टाग्रामवर आपल्या गर्लफ्रेंड Gabriella Demetriade सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती गरोदर असल्याचं स्पष्ट दिसतं. या फोटोला कॅप्शन देताना अर्जुनने लिहिले की, 'तू माझ्या आयुष्यात आलीस आणि या नव्या सुरुवातीमुळे मी फार आनंदी आहे. या बाळासाठी धन्यवाद.' अर्जुन तिसऱ्यांदा बाबा होणा आहे. याआधी पूर्वाश्रमीची पत्नी मेहर जेसियापासून त्याला माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. आता तो तिसऱ्यांदा बाबा होणार म्हणून सध्या अर्जुन रामपाल फारच खूश आहे. त्याने जो फोटो शेअर केला त्यावरून दोघांनी मॅटर्निटी फोटोशूट केलं असंच वाटतं.

 

View this post on Instagram

 

Blessed to have you and start all over again....thank you baby for this baby 👶🏽

A post shared by Arjun (@rampal72) on

Gabriella हा दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आहे. तिने २००९ मध्ये मिस इंडियन प्रिमिअर लीगमध्ये भाग घेतला होता आणि एफएचएमच्या जगातील १०० मादक महिलांमध्ये तिची निवड करण्यात आली. तिला खरी ओळख मिस IPL बॉलिवूड हा किताब जिंकल्यानंतर मिळाली. डेक्कन चारर्जसला ती रीप्रेझेंट करत होती. याशिवाय तिने काही सिनेमांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.

अर्जुन रामपालच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ZEE5 च्या वेब सीरिज 'द फायनल कॉल' मध्ये दिसला होता. अर्जुन आणि Gabriella ने अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही. त्यात या बातमीमुळे त्याने एक मोठं पाऊल उचललं असंच म्हणावं लागेल.

First published: April 24, 2019, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading