मलायकाला पाहताच सर्व विसरला अर्जुन कपूर, केली अशी भन्नाट कमेंट

मलायकाला पाहताच सर्व विसरला अर्जुन कपूर, केली अशी भन्नाट कमेंट

मलायकाचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. त्याचवेळी मलायकाच्या एका खास मित्रानेही कमेंट केली. त्याच्या कमेंटमुळे सर्वांचं लक्ष त्या कमेंटकडे वळलं.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च- जिम लूकपासून ते पार्टीपर्यंत आपल्या स्टाइल आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असणारी मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरच्या एका कमेंटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमाला मलायका गेली होती. या कार्यक्रमासाठी मलायकाने खास थ्री पीस सूट घातला होता. नेहमीप्रमाणे ती या ड्रेसमध्येही फार मादक दिसत होती.

View this post on Instagram

@chivasindia @gpkritikos @nashishsoni 📸 @ektakauroberoi

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

तिच्या या फोटोंचं चाहत्यांप्रमाणे अर्जुन कपूरही कौतुक करण्यावाचून स्वतःला रोखू शकला नाही. अर्जुनने कोणाचीही परवा न करता मलायकाच्या फोटोवर कमेंट केली. त्याची हीच कमेंट आता चर्चेचा विषय ठरत आहे. हाय वेस्ट ट्राउझरसोबत शिमरी सिल्वर हील्समध्ये मलायका स्टाइल आयकॉन दिसत होती. तिच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर स्मोकी आईजसोबत न्यूड शेडची लिपस्टिकने मलायकाच्या लूकला एक वेगळाच अंदाज दिला. कमीत कमी मेकअपमुळे मलायका फारच सुंदर दिसत होती.

मलायकाचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. त्याचवेळी मलायकाच्या एका खास मित्रानेही कमेंट केली. त्याच्या कमेंटमुळे सर्वांचं लक्ष त्या कमेंटकडे वळलं. अर्जुनने मलायकाला रॉयल मेश म्हटलं. या कमेंटनंतर सर्व फोटोवर कमी आणि त्याच्या कमेंटवरच जास्त चर्चा करू लागले.

First published: March 18, 2019, 8:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading