श्रीदेवीचा द्वेष आणि मलायकावर प्रेम कसं? सोशल मीडियावर अर्जुनने दिलं युझरच्या या प्रश्नाचं उत्तर

‘तुझ्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीचा (श्रीदेवी) तू नेहमीच द्वेष केला. कारण त्यांनी श्रीदेवीसाठी तुझ्या आईला सोडलं. पण आता तू अशा महिलेला डेट करत आहेस जी तुझ्याहून ११ वर्षांनी मोठी आहे आणि तिचा एक मुलगा आहे. ही दुटप्पी भूमिका का अर्जुन?’

News18 Lokmat | Updated On: May 29, 2019 02:33 PM IST

श्रीदेवीचा द्वेष आणि मलायकावर प्रेम कसं? सोशल मीडियावर अर्जुनने दिलं युझरच्या या प्रश्नाचं उत्तर

मुंबई, 29 मे- अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने ते एकमेकांना डेट करत असल्याचं अधिकृतरित्या मान्य केलं. यानंतर अर्जुनला त्यांच्या नात्याशी निगडीत अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं दोघांनी टाळलं पण अर्जुनने मात्र एका युझरच्या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं समजलं.

एका युझरने सोशल मीडियावर अर्जुनला टॅग करत म्हटलं की, ‘तुझ्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीचा (श्रीदेवी) तू नेहमीच द्वेष केला. कारण त्यांनी श्रीदेवीसाठी तुझ्या आईला सोडलं. पण आता तू अशा महिलेला डेट करत आहेस जी तुझ्याहून ११ वर्षांनी मोठी आहे आणि तिचा एक मुलगा आहे. ही दुटप्पी भूमिका का अर्जुन?’

Finally मलायका- अर्जुनने मान्य केलं त्यांचं नातं, नात्याबद्दल तो म्हणाला...अर्जुनला या ट्वीटला उत्तर देणं गरजेचं वाटलं. त्याने लिहिले की, ‘मी कोणाचा द्वेष करत नाही कुसूम. आम्ही दोघांनी एकमेकांचा सन्मान करत अंतर ठेवलं होतं. जर आमच्या दोघांमध्ये द्वेष असता तर त्या दिवसांमध्ये मी बाबा, जान्हवी आणि खुशीसोबत नसतो. टाइप करून लिहिणं आणि एखाद्याबद्दल मत बनवणं फार सोपं असतं. लिहिण्याआधी थोडा विचार करा. तू वरुण धवनची चाहती आहे तर वरुण धवनचा फोटो डीपीवर लावून तू नकारात्मकता पसरवू नकोस.’


आजोबा जाऊन 24 तासही उलटले नाहीत आणि अजय-काजोलच्या लेकीने केली सलॉन वारी, VIDEO व्हायरलयानंतर युझरने लगेच अर्जुनची माफी मागितली. तिने ट्वीट करत लिहिले की, ‘मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. तसेच अर्जुनच्या चाहत्यांचीही माफी मागते. मला माफ करा. हे फक्त माझं मत होतं. हे अर्जुन आणि मलायकाच्या विरोधात नव्हतं. सॉरी अर्जुन कपूर सर.’रेड बिकीनीमध्ये पुन्हा एकदा दिसला मलायकाचा HOT अंदाज, PHOTO VIRAL

यानंतर अर्जुनने लिहिले की, काहीच हरकत नाही कुसूम. भरभरून प्रेम कर. स्ट्रीट डान्सर तुला पाहतोय. यानंतर वरुण धवनने ट्वीट करत म्हटलं की, ‘कुसूम मला हे वाचून आनंद झाला की तू माफी मागितलीस. सगळ्यांनाच आपल्या पद्धतीने जगू द्या. अर्जुन मनाचा फार मोठा आहे. माझ्या चाहत्यांकडून त्याचं मन दुखावलं जाईल हे मला कधीच आवडणार नाही.’

SPECIAL REPORT : दहावीपेक्षा बारावीचे मार्क भरपूर, पाहा आर्चीचं रिपोर्टकार्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...