आई तू फक्त परत ये- अर्जून कपूर

आई तू फक्त परत ये- अर्जून कपूर

२५ मार्च २०१२ अर्जुनची आई मोना कपूर यांचं कर्करोगाने निधन झालं. मोना यांचं निधन त्यावेळी झालं जेव्हा अर्जुनचा पहिला सिनेमा 'इश्कजादे' प्रदर्शित होणार होता.

  • Share this:

मुंबई, २५ मार्च- अर्जुन कपूरने त्याची आई मोना शौरी कपूरच्या सातव्या पुण्यतिथीवर तिच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला. यावेळी त्याने लिहिले की, ‘तू माझं हसू होतीस आणि मी अपेक्षा करतो की तू जिथे कुठे असशील मी तुझ्या चेहऱ्यावर हसू आणत असेन. सात वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेलीस आणि तुझा मुलगा फक्त तुला एकच गोष्ट सांगतो की, तू परत ये...’

२५ मार्च २०१२ अर्जुनची आई मोना कपूर यांचं कर्करोगाने निधन झालं. मोना यांचं निधन त्यावेळी झालं जेव्हा अर्जुनचा पहिला सिनेमा इश्कजादे प्रदर्शित होणार होता. मोना या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. श्रीदेवी यांचंही गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाला. श्रीदेवी यांचंही तेव्हा निधन झालं जेव्हा जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार होता.

अर्जुन आणि अंशुला आपल्या आईच्या फार जवळ होते. अंशुलानेही आईचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. एका फोटोमध्ये मोना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये लहानपणीची अंशुला दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना अंशुलाने लिहिले की, ‘परत ये आई...’

अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच अर्जुन संदीप और पिंकी फरार, इंडियाज मोस्ट वॉन्टेड आणि पानीपत या सिनेमांमध्ये दिसणार आहे. यातही सध्या त्याच्या पानीपत सिनेमाची बी-टाऊनमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर करत असून अर्जुनशिवाय सिनेमात संजय दत्त आणि क्रिती सेननची मुख्य भूमिका आहे.

VIDEO : बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणतात...

First published: March 25, 2019, 9:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading