आता १९ एप्रिलला होऊच शकत नाही अर्जुन- मलायकाचं लग्न, मिळाला सर्वात मोठा ‘क्लू’

अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं. तर कॉफी विथ करणमध्ये अर्जुनने स्पष्ट केलं की तो आता लग्नासाठी पूर्ण तयार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 10:17 PM IST

आता १९ एप्रिलला होऊच शकत नाही अर्जुन- मलायकाचं लग्न, मिळाला सर्वात मोठा ‘क्लू’

मुंबई, १ एप्रिल- अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा येत्या १९ एप्रिलला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं होतं. एवढंच काय तर दोघं आपली बॅचलर पार्टी एन्जॉय करत आहेत. दोघांच्या लग्नात करीना कपूर, करिश्मा कपूर आणि अर्जुनचे जवळचे मित्र- मैत्रिणी उपस्थित राहणार आहेत असं म्हटलं जात होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आलेलं हे बॉलिवूडचं कपल येत्या १९ तारखेला लग्न करणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मलायका ही ख्रिश्चन असून ती ख्रिश्चन परंपरा मानते आणि नेमकी याच गोष्टीमुळे दोघं १९ तारखेला लग्न करणार नाहीत.


पिंकविलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात अर्जुन- मलायका १९ तारखेला लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे. १९ एप्रिलला लग्न न करण्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे त्या दिवशी गुड फ्रायडे आहे. या दिवशी जीजस सुळीवर चढले होते. ख्रिश्चनांमध्ये गुड फ्रायडे हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी चर्चमध्ये कोणी लग्न किंवा मंगल कार्य करत नाहीत. त्यामुळे या दिवशी मलायका- अर्जुन लग्न करणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे.

मलायका नुकतीच मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटून मुंबईत परतली. असं म्हटलं जातं की मलायका तिच्या बॅचलर पार्टीसाठी मालदिवमध्ये गेली होती.

Loading...


असं असलं तरी अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं. तर कॉफी विथ करणमध्ये अर्जुनने स्पष्ट केलं की तो आता लग्नासाठी पूर्ण तयार आहे. याआधी तो तयार नव्हता मात्र आता दोनाचे चार हात करायला तो तयार आहे.

मलायका अरोराचा एक्स पती अरबाज खानशी जेव्हा यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं शिताफीनं उत्तर द्यायचं टाळलं. तो म्हणाला की, ‘भावा, तू जो हा प्रश्न विचारला त्याचा विचार करण्यासाठी तू फार मेहनत घेतली असशील. पूर्ण रात्र जागून तू हा प्रश्न तयार केला असशील. तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मलाही थोडा वेळ दे. मी याचं उत्तर उद्या देतो.’

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2019 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...