News18 Lokmat

...म्हणून अर्जन सिंग ढसाढसा रडलेला, धोनीच्या चाहत्याने सांगितले त्यामागील कारण

त्याची समजूत काढणारं एक ट्विट हरभजन सिंगने केले

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2018 05:07 PM IST

...म्हणून अर्जन सिंग ढसाढसा रडलेला, धोनीच्या चाहत्याने सांगितले त्यामागील कारण

२८ सप्टेंबर, २०१८- भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान २६ सप्टेंबरला झालेला एशिया कपचा सुपर ४ चा सामना अनिर्णीत राहिला होता. अफगाणिस्तानने भारतासमोर ठेवलेलं २५३ धावांचं लक्ष पार करताना टीम इंडियाच्या नाकी नऊ आलेले. भारताने ४९.५ षटकात २५२ धावा करत सामना बरोबरीत सोडवला.

फलंदाज रवींद्र जडेजा बाद होताच पॅवेलियनमध्ये बसलेला एक मुलगा अर्जन सिंग रडायला लागला. सुरूवातीला त्याला भारताने सामना गमावला असेच वाटले. रडणाऱ्या अर्जनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. पण आज अर्जनने त्याच्या रडण्याचे खरं कारण सांगितलं.

Loading...

अर्जन म्हणाला की, मी शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा आनंद लुटत होतो. पण शेवटच्या चेंडूवर जडेजाने जेव्हा फटटका मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला वाटलं की षटकार लागेल. पण तो बाद झाला. नेमकी याच कारणामुळे मी रडायला लागलो. एक कर्णधार म्हणून धोनीने त्याच्या कारकिर्दितील शेवटचा सामना हरू नये असेच मला वाटत होते.

रडणाऱ्या अर्जनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तेव्हा त्याची समजूत काढणारं एक ट्विट हरभजन सिंगने केले. अंतिम सामना आपणच जिंकू असं आश्वासन हरभजनने अर्जनला दिलं. तसेच टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार तर अर्जनसोबत फोनवर बोललाही. तसेच अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानने अर्जनसोबत फोटोही काढले.

Lata Mangeshkar Birthday: नेहा राजपालनं दिल्या सुरमयी शुभेच्छा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2018 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...