मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Smartphone Addiction : तुम्हालाही स्मार्टफोनचं व्यसन लागलंय का? या टिप्स वापरून मोबाइलचा वापर करा कमी

Smartphone Addiction : तुम्हालाही स्मार्टफोनचं व्यसन लागलंय का? या टिप्स वापरून मोबाइलचा वापर करा कमी

स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. काही लोकांना त्याचे व्यसन जडते, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याची लक्षणे ओळखणे आणि हे व्यसन सोडवणे खूप महत्वाचे आहे.

स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. काही लोकांना त्याचे व्यसन जडते, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याची लक्षणे ओळखणे आणि हे व्यसन सोडवणे खूप महत्वाचे आहे.

स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. काही लोकांना त्याचे व्यसन जडते, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याची लक्षणे ओळखणे आणि हे व्यसन सोडवणे खूप महत्वाचे आहे.

  मुंबई, 24 जुलै : सध्या बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहे. सर्व वयोगटातील लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्मार्टफोनचा भरपूर वापर करतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. तुम्ही घरी बसल्या फोनवरून अनेक महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. स्मार्टफोनच्या फायद्यांसोबतच काही तोटेही आहेत. जर ते जास्त प्रमाणात वापरले गेले तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप हानिकारक सिद्ध होऊ शकते. आजच्या युगात लोकांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे कोणत्या प्रकारच्या मानसिक समस्या उद्भवू शकतात आणि कोणत्या लक्षणांवरून तुम्ही व्यसन ओळखू शकता याबद्दल माहिती देणार आहोत. स्मार्टफोनचे व्यसन मानसिक आरोग्यासाठी घातक आहे हेल्थलाइनच्या अहवालानुसार, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे अनेक व्यावहारिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. फोनच्या अतिवापरामुळे, लोक त्यांच्या वागण्यावर नियंत्रण गमावतात आणि सहनशीलतेची भावनादेखील कमी होते. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यातून हिंसाचाराची प्रवृत्ती वाढत आहे. मानसिक समस्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या अतिवापरामुळे चिंता, नैराश्य, निद्रानाश, नातेसंबंधात तणाव निर्माण होणे, अभ्यासात व्यत्यय येणे आणि कामाच्या ठिकाणी कामगिरी कमी होणे असे प्रकार होऊ शकतात. गाडी चालवताना फोन वापरल्याने अपघात होऊ शकतात.

  तुम्हीही बाटलीबंद पाणी पिताय? मग वाचा 'हे' दुष्परिणाम

  या लक्षणांद्वारे व्यसन ओळखा - एकटे असताना कंटाळा आल्यामुळे स्मार्टफोन वापरणे - फोन तपासण्यासाठी रात्री अनेक वेळा उठणे - जेव्हा तुम्ही फोनपासून दूर असता तेव्हा चिडचिड करणे किंवा नाराज होणे - फोन वापरताना अपघात होणे - फोनवर जास्त वेळ घालवणे - काम करताना किंवा अभ्यास करताना फोनकडे पाहणे - तुमच्या फोनच्या वापराबद्दल घरच्यांनी काळजी करणे - फोन वापरण्याच्या वेळेवर नियंत्रण न ठेवता येणे

  मोबाईलच्या अतिवापराने आयुष्य होतंय कमी? संशोधकांचा इशारा, लवकर व्हा सावध

  फोनच्या व्यसनापासून मुक्ती कशी मिळवावी - तुमच्या फोनमधून वेळ वाया घालवणारे अॅप्स हटवा - नोटिफिकेशन आणि इतर अलर्ट बंद करा - रात्री फोन बेडपासून दूर ठेवा किंवा बंद करा - फोन पुन्हा पुन्हा पाहणे टाळण्याचा प्रयत्न करा - तुमचा फोन नजरेआड ठेवा. फोन इतरत्र चार्ज करा - सोशल मीडियाऐवजी वास्तविक जीवनातील मित्रांना भेटा - कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा आणि फोनपासून दूर राहा - तुम्हाला जे आवडते ते करा आणि त्याचा आनंद घ्या
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Smartphones

  पुढील बातम्या