मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

डायबेटिसच्या रुग्णांना कॅन्सर होण्याची शक्यता असते का? डाएटिशियन तज्ज्ञ काय सांगतात पहा

डायबेटिसच्या रुग्णांना कॅन्सर होण्याची शक्यता असते का? डाएटिशियन तज्ज्ञ काय सांगतात पहा

डायबेटिस आणि कॅन्सर

डायबेटिस आणि कॅन्सर

कोलनमधील निरोगी पेशी त्यांच्या डीएनएमध्ये म्युटेशन प्रक्रिया विकसित करतात आणि ट्युमर तयार करण्यासाठी एकत्र येतात. कालांतराने या कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि आसपासच्या टिश्युंवर आक्रमण करून..

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : बदलती लाइफस्टाइल आणि योग्य आहार न घेतल्याने डायबेटिस म्हणजेच मधुमेहाचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता तरुण आणि किशोरवयीन मुलांनाही हा आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. डायबेटिसच्या रुग्णांना इतर आजार होण्याची शक्यताही बळावते. टाइप 2 मधुमेहाचे मुख्य कारण रक्तातील पेशी इन्शुलिनच्या सामान्य पातळीला प्रतिसाद देऊ शकत नाहीत, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्तातील साखरेची वाढलेली पातळी संतुलित ठेवण्यासाठी रक्तातील इन्शुलिनचे प्रमाणही वाढते. यालाच मेडिकल सायन्सच्या भाषेत हायपरग्लायसेमिया म्हणतात.

डाएटिशियन अश्विनी एस. कानडे यांच्या मते, हायपरग्लायसेमिया कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचं कारण आहे. हायपरग्लायसेमियाचा धोका असलेल्या टाइप 2 मधुमेहामुळे कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. आम्ही कोलोरेक्टल कॅन्सर हे भारतात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं सहावं सर्वांत सामान्य कारण आहे. जेव्हा कोलनमधील पेशी नियंत्रणाबाहेर जातात, तेव्हा हा कॅन्सर होतो. 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कॅन्सरचा हा प्रकार पॉलीप्स नावाच्या लहान पेशींच्या समुहांपासून सुरू होतो. हे पॉलीप्स कोलनच्या आत तयार होतात आणि नंतर पॉलीप्स बनतात, अशी माहिती जनसत्ताने दिली आहे.

कोलनमधील निरोगी पेशी त्यांच्या डीएनएमध्ये म्युटेशन प्रक्रिया विकसित करतात आणि ट्युमर तयार करण्यासाठी एकत्र येतात. कालांतराने या कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि आसपासच्या टिश्युंवर आक्रमण करून त्यांना नष्ट करतात. कोलन कॅन्सर होण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नसलं तरी, कोलोरेक्टल कॅन्सर असलेल्या कुटुंबातील एका सदस्यापासून इतरांना हा आजार होण्याची शक्यता वाढते.

कॅन्सर आणि डायबेटिस यांच्यातील संबंध

दिल्ली एम्सचे डॉ. प्रशांत मेहता यांच्या मते, डायबेटिस रुग्णांना कॅन्सरचा धोका असू शकतो, कारण डायबेटिसमुळे इतर अनेक आजार होतात. या रुग्णांना मेटाबॉलिक समस्या होतात, त्यामुळे फॅटी लिव्हरदेखील होऊ शकते. फॅटी लिव्हरमुळे एखाद्याला लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. डायबेटिस आणि इतर आजारांमुळे कॅन्सर होऊ शकतो.

कोलन कॅन्सर कोणत्या वयातील लोकांना होतो

कोलन कॅन्सरचं निदान कोणत्याही वयात केलं जाऊ शकतं, परंतु 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ते जास्त आढळतं. कोलन कॅन्सर अनुवंशिक सिंड्रोम फॅमिलीअल एडिनोमॅटस पॉलीपोसिस (FAP) आणि लिंच सिंड्रोममुळेही होतो. याला अनुवंशिक नॉनपॉलीपोसिस कोलोरेक्टल कॅन्सरही (HNPCC) म्हटलं जातं. पण याचं प्रमाण कमी आहे.

कॅन्सरचा धोका कशामुळे वाढतो

जे लोक जास्त चरबीयुक्त किंवा कमी फायबरयुक्त आहार घेतात, त्यांना कोलन कॅन्सरचा धोका जास्त असतो. जास्त मद्यपान आणि धूम्रपान केल्यानेही हा धोका निर्माण होऊ शकतो. निरोगी लाइफस्टाइल आणि नियमित शारीरिक हालचाली करून हा धोका कमी केला जाऊ शकतो.

हे वाचा - पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच उपचार न केल्यास उद्भवू शकते गंभीर परिस्थिती

या लोकांमध्ये वाढतो धोका

टाइप 2 डायबेटिस असलेल्या रुग्णांना कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. लठ्ठ लोकांनाही जास्त धोका असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे, मद्यपान मर्यादित करणे, धूम्रपान न करणे आणि नियमित व्यायाम या गोष्टी करून कोलन कॅन्सरचा धोका कमी करता येतो. कोलन कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सर्जरीद्वारे त्यावर उपचार करता येतात.

First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes