प्रेमाचा खूनी खेळ! प्रियकराच्या हत्येनंतर केले 7 तुकडे, ज्या डोळ्यांनी प्रेम केलं तेही काढले बाहेर

प्रेमाचा खूनी खेळ! प्रियकराच्या हत्येनंतर केले 7 तुकडे, ज्या डोळ्यांनी प्रेम केलं तेही काढले बाहेर

प्रियकराची हत्या निघृण हत्या करण्यात आली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे हत्येनंतर मृत तरुणाच्या शरीराचे तब्बल 7 तुकडे करण्यात आले आहेत.

  • Share this:

बिहार, 25 ऑगस्ट : प्रेम प्रकरणामुळे गुन्हे होण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. गुन्हाचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये प्रियकराची हत्या निघृण हत्या करण्यात आली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे हत्येनंतर मृत तरुणाच्या शरीराचे तब्बल 7 तुकडे करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. शरीराचे सात तुकडे केल्यानंतर त्याला शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक असं हत्या केलेल्या प्रियकराचं नाव आहे. पोलिसांनी शेतामधून अभिषेकच्या शरीराचे 7 तुकडे सापडले. ज्यामध्ये त्याचे डोळे, पाय, हात, धड आणि शिर शरीरापासून वेगवेगळं करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून अभिषेकची निघृणरित्या हत्या करण्यात आली आहे. त्याच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावातून शोक व्यक्त केला जात आहे.

कोचिंग क्लासेसवेळी दोघांमध्ये झालं प्रेम

मृताच्या कुटूंबाने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या घरी कोचिंग क्लासेस होते. तिथे अभिषेक आणि मुलगी शिकण्यासाठी येत होती. नंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण 2 महिन्यांपूर्वी मुलीचा एका दुसऱ्या तरुणाशी विवाह झाला. लग्न झाल्यानंतरी अभिषेक आणि तरुणीमध्ये संबंध होते. ते एकमेकांना भेटायचे. 17 ऑगस्ट रोजी मुलीने अभिषेकला रात्री 10 वाजता घरी बोलावलं होतं, त्यानंतर अभिषेक बेपत्ता झाला होता. 7 दिवसांनंतर 24 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अभिषेकचा मृतदेह शेतात सापडला. पोलिसांनी मुलीच्या घराजवळून एक किलोमीटर अंतरावर मृताचा मृतदेह ताब्यात घेतला.

इतर बातम्या - सुप्रिया सुळेंनी थेट सत्ताधाऱ्यांना केले 'हे' ओपन चॅलेंज, म्हणाल्या...

17 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आली

अभिषेकचा मृतदेह सापडल्यानंतर मुलीचे कुटुंबीय घर सोडून फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात संशयाची सुई दिसली. अभिषेकची आई रंभा दिवी यांनी  17 ऑगस्टपासून अभिषेक बेपत्ता असल्याचा अहवाल राणीगंज पोलिस ठाण्यात दाखल केला. त्यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप रंभा देवी यांनी केला आहे. पोलिसांनी सहकार्य केलं असतं तर आज अभिषेक जीवंत असता असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या - अरुण जेटलींची एवढ्या कोट्यवधींची प्रॉपर्टी, कोण आहे वारसदार?

पोलिसांनी घटनास्थळावरून अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन रिपोर्टनुसार, शरीराचे वेगवेगळे केलेले भाग हे अभिषेकचेच असल्याचं उघड झालं. राणीगंज पोलीस ठाण्यात मुलीकडच्या 4 जणांना कलम 363/365 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी कुटुंब घटना घडल्या दिवशीपासून फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता त्यांचा कसून शोध बिहार पोलीस घेत आहे.

उलट्या काळजाचा! कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bihar News
First Published: Aug 25, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या