Home /News /news /

Apple चा नवा कॉम्प्युटर घ्यायचा विचार करत असाल तर आधी हे वाचा... Apple Mac Pro च्या किमतीत तुम्ही 'या' 7 वस्तू घेऊ शकता

Apple चा नवा कॉम्प्युटर घ्यायचा विचार करत असाल तर आधी हे वाचा... Apple Mac Pro च्या किमतीत तुम्ही 'या' 7 वस्तू घेऊ शकता

Apple Mac Pro ची चर्चा सगळीकडे असली तरी हे आधी वाचा. हा कॉम्प्युटर विकत घ्यायचा विचार करत असाल तर एक वानगीदाखल हिशोब आम्ही मांडून दाखवतो. गंमत म्हणून मांडलेला पण विचार करायला लावणारा हिशोब!

    मुंबई, 26 सप्टेंबर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर Apple ने भारतात आपलं ऑनलाइन स्टोअर सुरू केलं आहे. CEO टीम कुक यांनी 23 सप्टेंबर रोजी याची घोषणा केल्यानंतर आता भारतात ऑनलाईन पद्धतीने देखील अॅपलच्या स्टोअरमधून नागरिक खरेदी करू शकणार आहेत. या Apple Online store मधली सर्वांत देखणी पण महागडी वस्तू कोणती माहिती आहे? नवा Apple Mac Pro हा कॉम्प्युटर सर्वात महागडा असून याची किंमत 53,02,800 रुपये आहे. Apple Mac Pro ची चर्चा सगळीकडे असली तरी हे आधी वाचा. हा कॉम्प्युटर विकत घ्यायचा विचार करत असाल तर एक वानगीदाखल हिशोब आम्ही मांडून दाखवतो. त्याचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. या मॅक प्रोच्या किमतीत काय काय आणि किती येऊ शकेल याचा हा हिशोब... असाच गंमत म्हणून मांडलेला पण विचार करायला लावणारा! Apple Mac Pro च्या किमतीत येतील या 7 गोष्टी 1) सफरचंद 53 लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे. यामुळे तुम्ही हवं ते यामधून खरेदी करू शकता. सफरचंदाचा विचार केला तर तुम्ही 100 रुपये किलोच्या हिशोबाने 53,000 किलो सफरचंद खरेदी करू शकता. 2) NETFLIX SUBSCRIPTION आजकाल घरात बसल्या बसल्या NETFLIX मनोरंजनाचं मोठं साधन आहे. नेटफ्लिक्सचा 799 रुपये वार्षिक प्लॅन आहे. 53 लाख रुपयांमधून तुम्ही एकूण 552 वर्षांसाठी नेटफ्लिक्स वापरू शकता किंवा Netflix चा वार्षिक प्लॅन साडेपाचशे मित्रांना दान करू शकता. 3) डायपर्स कोरोनाच्या या संकटात लहानमुलांच्या डायपरची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र तुम्ही विचार केला आहे की, 53 लाख रुपयांमध्ये किती डायपर्स येऊ शकतात. 500 रुपयांचं एक डायपरचं पॅकेटची असतं अशी 10,600 डायपर पॅकेट्स तुम्ही विकत घेऊ शकाल. 4) गोल्ड मास्क तुमच्याकडे 53 लाख रुपये असतील तर तुम्ही पुण्यातल्या एका ज्वेलरने बनवला तसा 2.9 लाख रुपयांचा एक असे 15 सोन्याचे मास्कदेखील बनवून घेऊ शकता. मात्र हा मास्क तुमचं कोरोनापासून संरक्षण करू शकणार नाही. 5) BUS सार्वजनिक बस वाहतुकीतून प्रवास करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही 53 लाख रुपयांमधून जवळपास 40 सीटरच्या 4 मिनीबस खरेदी करू शकता. 6) टेलिस्कोप विविध प्रकारचे टेलिस्कोप शास्रज्ञ वापरत असतात. आकाशगंगेतील ग्रह पाहण्यासाठी तुम्ही टेलिस्कोप खरेदी करू शकता. 53 लाख रुपयांमधून तुम्ही जवळपास 35 टेलिस्कोप खरेदी करू शकता. 7) अक्षय कुमारसारखे दुप्पट पैसे फिर हेरा फेरी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या 25 दिवसांत पैसे डबल या योजनेत पैसे गुंतवू शकता. मात्र हे पैसे परत मिळतील की नाही याची खात्री तुम्हाला स्वतः देव देखील देणार नाही.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Apple

    पुढील बातम्या