Apple लाँच करणार 5G फोन; त्यासाठी एवढा काळ आणखी वाट पहावी लागणार

Apple लाँच करणार 5G फोन; त्यासाठी एवढा काळ आणखी वाट पहावी लागणार

नवी दिल्ली, 1 मे : Apple iPad Pro चं 5G वेरियंटसाठी भारतीयांना आणखी 2 वर्ष वाट पहावी लागणार, असं कंपनीचे CEO मिंग-ची कुओ यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मे : Apple iPad Pro चं 5G वेरियंटसाठी भारतीयांना आणखी 2 वर्ष वाट पहावी लागणार, असं कंपनीचे CEO मिंग-ची कुओ यांनी म्हटलं आहे. Apple चा 5G स्मार्टफोन 2021 मध्ये लाँच होऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कमी सिग्नल असताना उत्तम नेटवर्क क्वालिटी मिळावी यासाठी Apple वर्ष 2020 पासून आपल्या iPad Pro मध्ये लिक्विड क्रिस्टल पॉलिमर बोर्ड्स (LCP) चा वापर करणार आहे. त्यासाठी 2020 पासून लाँच होणाऱ्या iPhone मध्ये कंपनी LCP एंटीना देणार आहे. जो 5G नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 2021 मध्ये Apple LCP तंत्रज्ञानावर आधारित 5G iPad Pro लाँच करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 11 इंचाचा एक आणि 12.9 इंचाचा एक अशा दोन आकारात हे फोन राहतील. 5G iPad Pro लाँच करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनीने गेल्या वर्षापासूनच आपल्या तंत्रज्ञानात अनेक मोठे बदल करण्यास सुरूवात केली.

यासंदर्भात 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, Intel कंपनी आपला व्यवसाय आणखी वाढविण्याचा विचारात असून, त्यासाठी Apple सारख्या कंपनीला तंत्रज्ञान विकण्याच्या विचारात आहे. Apple सुद्धा यासाठी उत्सुक असून दोन्ही कंपन्यांमध्ये 5G तंत्रज्ञानासह इतर गोष्टींवरही चर्चा सुरू असल्याचं 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने वृत्तात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: apple
First Published: May 1, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या