Apple Event : आला रे आला 3 कॅमेऱ्यावाला iPhone आला, असे आहे फिचर्स आणि किंमत!

Apple Event : आला रे आला 3 कॅमेऱ्यावाला iPhone आला, असे आहे फिचर्स आणि किंमत!

Apple ने आपल्या iPhone सिरीजमधील 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोन लाँच केले आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : मोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी असलेल्या Apple ने अखेर आपला नवा कोरा iPhone लाँच केला आहे. Apple ने आपल्या iPhone सिरीजमधील 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोन लाँच केले आहे.

अॅपलचे प्रमुख टिम कुक यांनी यांनी तिन्ही फोन आणि आयपॅड, वॅचही घोषणा केली आहे. आयफोन 11 हा लाँच करण्यात आला आहे. यामध्ये डुअल रिअर कॅमेरे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सल असणार आहे.

iphone 11 हा 6 वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असणार आहे. यामध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेडिना डिस्पले असणार आहे. हा फोन iPhone xr पेक्षा एक तास जास्त बॅटरी बॅकअॅप देईल. या फोनची किंमत ही 699 डॉलर इतकी किंमत असणार आहे.

यासोबतच iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे फोनही लाँच करण्यात आले आहे. iPhone 11 Pro मध्ये नवीन वाईड कॅमरा, टेलीफोटो कॅमेरा आणि अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.

iPhone 11 चे फिचर्स

-6.1" Liquid Retina Display

-6 नवी कलर्स

-Spacial Audio with Dolby Atmos

-12MP डुअल कॅमेरा (Primary f1.8 OIS, Ultrawide f2.4 (120°)

-12MP सेल्फी कॅमेरा

-4K 60FPS (All cameras)

-नाइट मोड

-क्विक टेक

-A13 Bionic (चिपसेट)

-IP68

-Faster Face ID

किती आहे किंमत?

iPhone 11 - 699 डॉलर

iPhone 11 Pro - 999 डॉलर

iPhone 11 Pro Max - 1099 डॉलर

भारतात कधी मिळणार

प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार भारतात 20 सप्टेंबरपासून आयफोन 11 विक्रीसाठी उपलब्ध होतील.

ही आहेत फीचर्स

आयफोन 11 तीन प्रकारांत उपलब्ध असेल. आधीच्या सीरिजप्रमाणेच स्टोरेजच्या हिशोबाने हे प्रकार असतील आणि अधिक मेमरी स्टोरेज असलेला फोन महाग असेल. 64GB, 128GB आणि 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये आयफोन11 उपलब्ध असेल. या सगळ्या फोनला 12 मेगापिक्सेल सेन्सर कॅमेरा असणार आहे. iPhone Pro आणि iPhone Pro Max या फोनला 12-megapixel sensors सह वेगवेगळ्या फोकल लेन्थ असतील. iPhone 11 ला मात्र फक्त 12-megapixel sensors सह रेग्युलर लेन्स असेल आणि टेलिफोटो लेन्स सर्व फोनमध्ये असेल.

==================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2019 11:57 PM IST

ताज्या बातम्या