मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड...' खासदार नवनीत राणांच्या उखाण्यावर पडल्या टाळ्या; पाहा VIDEO

'शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड...' खासदार नवनीत राणांच्या उखाण्यावर पडल्या टाळ्या; पाहा VIDEO

या पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हेदेखील पतंग बाजी करतात.

या पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हेदेखील पतंग बाजी करतात.

या पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हेदेखील पतंग बाजी करतात.

  • Published by:  Meenal Gangurde
अमरावती, 14 जानेवारी :  युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दरवर्षी पतंग महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हेदेखील पतंग बाजी करतात. यावेळी या महोत्सवात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतात. यावर्षी पतंग महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी पतंगावर स्लोगन लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली. (Applause fell on MP Navneet Rana) याच पतंग महोत्सव नवनीत राणा यांनी संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. हा महोत्सव अधिक बहारदार राहिला तो नवनीत राणा यांनी घेतलेल्या उखाण्यामुळे.'शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड, रवींचं बोलणं साखरेपेक्षा गोड' असा उखाणा घेतल्यानंतर महिलांचा एकच आवाज आला.(Applause fell on MP Navneet Rana) हे ही वाचा-'आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका'; लोकसभेत नवनीत राणांची मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गेल्या अनेक महिन्यात वारंवार ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीवरून नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी लोकसभेत केली होती. कोरोना काळात खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची लाखो रुपयांनी लूट होत आहे. ही खाजगी रुग्णालयात होणारी लूट थांबविण्यासाठी आकस्मिक कायदा लागू करावा, विदर्भात ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागले आहे', अशी माहिती देत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.
First published:

Tags: Amravati

पुढील बातम्या