VIDEO : अनुष्का शर्माने सगळ्या टीमच्या समोर विराटचा हात हातात घेऊन घेतलं चुंबन, विराटची रिअॅक्शन तर पाहा...

VIDEO : अनुष्का शर्माने सगळ्या टीमच्या समोर विराटचा हात हातात घेऊन घेतलं चुंबन, विराटची रिअॅक्शन तर पाहा...

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

 नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि  अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराट कोहलीच्या सन्मानार्थ दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानाच्या एका स्टँडला विराटचं नाव देण्यात आलं. फिरोझशहा कोटला Ferozshah Kotla स्टेडियमचं नाव बदलून दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली Arun Jaitley यांचं नाव देण्यात आलं. त्याच कार्यक्रमात विराटच्या नावाच्या स्टँडचंही उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विराट पत्नी अनुष्कासह उपस्थित होता. शिवाय टीम इंडियातले त्याचे इतर काही सहकारीही उपस्थित होते.

विराट- अनुष्का शेजारीच बसले होते. कार्यक्रम सुरू असताना अनुष्का शर्माने विराटचा हात हातात घेऊन त्याची पापी घेतली. विराटच्या हाताचा किस घेतानाचा अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

कार्यक्रमादरम्यान डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी भाषण करताना अरुण जेटली आणि विराट कोहली यांच्याविषयीची एक आठवण सांगितली. विराटचे वडील गेले त्या वेळी अरुण जेटली विराटच्या घरी सांत्वन करायला गेले होते.

पाहा PHOTO - स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करतेय धोनीची 'बेबी शार्क' झिवा

वडिलांच्या मृत्यूनंतर विराट मॅच खेळला आणि त्यानं खूप चांगली खेळी केली होती. एक दिवस विराट खूप मोठा होईल त्याचं नाव इतिहासात कोरलं जाईल, असं जेटली म्हणाले होते. हे ऐकत असताना भावुक झालेल्या विराटला पत्नी अनुष्काने साथ दिली. ती त्याचा हात हातात घेऊन त्याला चिअरअप करण्याचा प्रयत्न करत असतानाचा हा व्हिडिओ आहे.

हे वाचा - संजय दत्त आता या मुलीच्या प्रेमात, I Love You म्हणतानाचा व्हिडीओ आला समोर

अनुष्काच्या या कृतीने विराटलाही मोठा धीर आला. सावरून बसत त्यानं बराच वेळ आपल्या पत्नीचा हात घट्ट पकडून ठेवला होता.

----------------------------------------------

सलग दुसऱ्यादिवशी संगीत कार्यक्रमात उडवले लाखो रूपये, VIDEO VIRAL

First Published: Sep 13, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading