अनुष्का शर्मा मुक्या प्राण्यांसाठी बांधणार अॅनिमल शेल्टर !

कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी वाढदिवसाएवढं चांगलं निमित्त दुसरं असूच शकत नाही. त्यामुळेच एक पाऊल पुढे टाकत अनुष्काने खास मुक्या जीवांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 2, 2018 11:39 AM IST

अनुष्का शर्मा मुक्या प्राण्यांसाठी बांधणार अॅनिमल शेल्टर !

02 मे : कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी वाढदिवसाएवढं चांगलं निमित्त दुसरं असूच शकत नाही. त्यामुळेच एक पाऊल पुढे टाकत अनुष्काने खास मुक्या जीवांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

अनुष्काने तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी प्राण्यांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईबाहेर ती या शेल्टरची उभारणी करणार असून ज्या मुक्या जनावरांना मालकांनी सोडलं किंवा क्रूर अनुभव आले अशांसाठी हे घर असेल असं तीने सांगितलं आहे. अनुष्काच्या या उपक्रमाला नेटीझन्सनीही जाहीर पाठिंबा दिला आहे.

कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करायची असेल तर वाढदिवसाहून चांगला दिवस तो कोणता? तेव्हा आजच्या दिवशी एक पाऊल पुढे टाकत अनुष्कानं खास मुक्या जीवांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू केलं आहे. आज अनुष्काचा वाढदिवस आहे तेव्हा बॉलिवूडच्या 'परी'नं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत प्राण्यांसाठी अॅनिमल शेल्टर सुरू केल्याची आनंदवार्ता दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2018 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...