मोदींना मतदान करा, असा whatsapp मेसेज आल्यावर अनुराग कश्यपनं काय केलं पाहा

मोदींना मतदान करा, असा whatsapp मेसेज आल्यावर अनुराग कश्यपनं काय केलं पाहा

जर काही कलाकार मोदींना मत देऊ नका यासाठी पुढाकार घेत आहेत तर मग आम्ही कसं गप्प बसू.

  • Share this:

मुंबई, १२ एप्रिल- बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप सध्या सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये व्यग्र आहे. अनुराग अनेकदा भाजप आणि मोदी विरोधात ट्वीट करत असतो. तसेच भाजपला मत देऊ नका असं म्हणणाऱ्या सेलिब्रिटींमध्येही अनुरागचं नाव आहे. पण नेमकी याच गोष्टीमुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही होतो.

आताही अनुराग सोशल मीडियावर एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. एका भाजप समर्थकाने अनुरागला मेसेज पाठवून नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला मतदान करण्याचं आणि भाजप पक्षात प्रवेश करण्याबद्दल विचारले. अनुरागला हा मेसेज व्हॉट्सअपवर मिळाला. यानंतर दिग्दर्शकाने हा मेसेज ट्विटरवर टाकत याबद्दल लोकांना सांगितले. रिपोर्ट्सनुसार मेसेज पाठवणारा भाजपचा समर्थक असल्याचं म्हटलं जात आहे.

अनुरागने गुरुवारी व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजला ट्विटरवर शेअर करत मेसेज पाठवणाऱ्याचं नाव सांगत म्हटलं की, हा मेसेज ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसीएशनचे अध्यक्ष गौरक्षा धोत्रे यांनी तीन दिवसांपूर्वी पाठवला आहे. हा स्क्रीनशॉटचं सगळं काही सांगून जातो.

याबद्दल धोत्रे यांना आएएनएस या वृत्त संस्थेने विचारले असता ते म्हणाले की, ‘मी भाजपच्या विचारधारेचा समर्थक आहे आणि मी सिनेसृष्टीच्या सर्व लोकांना मोदींना मतदान करण्याचा आग्रह करत आहे. कारण देशाला मोदींसारख्या नेत्याची गरज आहे.’

धोत्रे पुढे म्हणाले की, ‘जर काही कलाकार मोदींना मत देऊ नका यासाठी पुढाकार घेत आहेत तर मग आम्ही कसं गप्प बसू. आम्हीही मोदींना मतदान करण्यासाठी सांगत आहोत.’

VIDEO : नवी मुंबईतील्या पादचारी पूल दुर्घटनेला जबाबदार कोण?

First published: April 12, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading