अकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप

अकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप

'मी खोलीची बेल वाजवली. दार उघडलं तेव्हा मला धक्काच बसला. कारण अकबर हे अंडरविअर घालून उभे होते. मी घाबरले होते'

  • Share this:

नवी दिल्ली, ता.16 ऑक्टोबर : परराष्ट्रमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आणखी एका महिला पत्रकारानं लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केलाय. त्यामुळं त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 12 पेक्षा जास्त महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्या महिला पत्रकाराने 'स्क्रोल' या इंग्रजी वेबसाईटवर एक खुलं पत्र लिहून अकबर यांच्याविरोधात आरोप केलेत. त्यांनी या पत्रात तीन घटनांचा उल्लेख केलाय. तर अकबर यांनी सर्व आरोप फेटाळत सोमवारी प्रिया रमाणी या महिला पत्रकाराविरूद्ध अब्रुनकसानीचा दावा दाखल केलाय.

'डेक्कन क्रॉनिकल' या वृत्तपत्रात असताना अकबर यांच्यासोबत काम केल्याचा दावा त्या महिला पत्रकारानं केलाय. 1992 मध्ये त्या 'डेक्कन क्रॉनिकल' मध्ये ट्रेनी म्हणून काम करत होत्या. आपला अनुभव सांगतांना त्यांनी लिहिलय की ''त्यावेळी मला विचारण्यात आलं होतं की तुम्ही अकबर यांना भेटणार का? अकबर यांचं नाव मोठं होतं. त्यामुळं मी होकार दिला.

नंतर अकबर यांनी माझ्या घरी फोन करून भेटण्याविषयी विचारलं. त्यांनी मला संध्याकाळी हॉटेलवर भेटायला बोलावलं. खूप विचार करून मी जाण्याचा निर्णय घेतला. मी खोलीची बेल वाजवली. दार उघडलं तेव्हा मला धक्काच बसला. कारण अकबर हे अंडरविअर घालून उभे होते. मी घाबरले होते. एका 22 वर्षांच्या मुलीचं स्वागत करण्याची ही घाणेरडी पद्धत होती का? ''

त्यांनी लिहिलेलं दुसरं उदाहरणही असंच धक्कादायक आहे. त्या लिहितात. "1993 मध्ये मी सीनिअर सब एडीटर म्हणून हैदराबादला 'डेक्कन क्रॉनिकल' जॉईन केलं. अकबर तिथे एडिटर-इन-चीफ होते. एकदा काही कामासाठी त्यांनी मला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं.

हॉटेलमध्ये पोहोचायला मला थोडा वेळ झाला. मी जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तोंडाचा चहाचा वास आणि मिशांचे रूतलेले केस मला आजही आठवतात. मी लगेच उठली आणि हॉटेलमधून धावतच सुटली. जोपर्यंत रिक्क्षा मिळत नव्हता तोपर्यंत मी धावतच होते."

यानंतरही अकबर यांनी तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्यांना कॉन्फरन्सरूममध्ये बोलावून लगट करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला.

सुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी

First published: October 16, 2018, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading