साई बाबांच्या जन्मस्थानावरून वादाला आणखी एक नवीन वळण!

साई बाबांच्या जन्मस्थानावरून वादाला आणखी एक नवीन वळण!

साई बाबांच्या जन्मभूमीवरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद सुरू असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा गावानं या वादात उडी घेतली आहे

  • Share this:

 

औरंगाबाद, 20 जानेवारी : साई बाबांच्या जन्मस्थानावरून सुरू झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा गावानं साईबाबा प्रकटल्याचा दावा केला आहे. त्यामुळं या वादाला आता नवं वळण लागलंय.

साई बाबांच्या जन्मभूमीवरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद सुरू असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा गावानं या वादात उडी घेतली आहे. साईबाबा सर्वप्रथम धुपखेडा गावात प्रकटल्याचा दावा इथल्या ग्रामस्थांनी केलाय. तसंच साई बाबांनी  धुपखेड्यात पहिला चमत्कार दाखवल्याचंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

साई बाबांची प्रकटभूमी म्हणून  धुपखेडा गावाला शासन मान्यता देण्यात यावी असा ठराव धुपखेडा गावच्या ग्रामसभेत करण्यात आलाय. हा ठराव आता राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे.

साई बाबांचं जन्मस्थान म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीतील पाथरी गावच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देण्याची नुकतीच घोषणा केली. आणि त्यानंतर साई बाबांच्या जन्मस्थनावरुन शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद सुरु झाला. पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ नसल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे तर पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थान असल्याच्या दाव्यावर पाथरीकर ठाम आहेत. या वादातून रविवारी शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदही पुकारला. तर पाथरीकरांनी दिवसभर भजन करुन राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं. आता या वादात धुपखेडा गावानं उडी घेतल्यामुळं साई तेरे कितने स्थान? असा प्रश्न साईभक्तांना पडलाय.

 उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी

दरम्यान, शिर्डी येथील ग्रामस्थांनी बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. शिर्डीच्या ग्रामस्थांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याचे या बैठकीत जाहीर केले. पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. जन्मस्थळाचा वाद कशासाठी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पाथरीला साई जन्मस्थानाचा दर्जा मिळाल्याने संतप्त झालेल्या शिर्डीकरांनी आपला बंद मागे घेतला. शिर्डी शिस्तमंडल ने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आमचा वाद मिटला आहे आम्ही बंद मागे घेतोय ही भूमिका घेतली. पण पथरीला दिलेल्या जन्मस्थानाचा मुद्दा निकाली निघाला का? यावर मात्र शिर्डीकरांनी भाष्य केले नाही.

First published: January 20, 2020, 11:42 PM IST
Tags: Shirdi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading