S M L

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

मराठा आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या पाठोपाठ आता काँग्रेसच्या आमदारानेही राजीनामा दिला आहे.

Updated On: Jul 26, 2018 05:02 PM IST

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

पंढरपूर, 26 जुलै : मराठा आरक्षणासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या पाठोपाठ आता काँग्रेसच्या आमदारानेही राजीनामा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. भालके यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षाकडे पाठवला आहे. आतापर्यंत एकूण तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

आज पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार  भारत भालके यांनी राजीनामा दिलाय. मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाला वेळोवेळी आरक्षण मिळावे अशी मागणी वारंवार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तोंडी आश्वासन दिलं पण याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असताना मला लोकप्रतिनिधी म्हणून या पदावर राहण्याचा नैतिकता वाटत नाही असं भालके यांनी सांगितलंय. त्यांनी आपला राजीनामा  विधानसभा अध्यक्षांकडे फॅक्सद्वारे पाठवला आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

Loading...

गेल्या चार दिवसांपासून मराठा ठोक आंदोलन राज्यभरात सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 24 जुलै रोजी ठिय्या आंदोलन केलं होतं. आणि सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश 24 तासात काढावा अशी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांना पाठवला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा दिलाय. दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असं चिकटगावकर यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक बोलावलीये. यात राज्यातले सर्व मंत्री सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मराठा आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 04:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close