मला जर काही झालं तर त्यासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार - अण्णा हजारे

मला जर काही झालं तर त्यासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार - अण्णा हजारे

काल मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्यानं अण्णा उपोषण सोडतायेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

राळेगणसिद्धी, 04 फेब्रुवारी : अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. त्यांचं वजनही कमी झालं आहे. दरम्यान, मला जर काय झालं तर या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरावं असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

काल मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्यानं अण्णा उपोषण सोडतायेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील अण्णांची आज भेट घेणार आहेत. कालच राज ठाकरे राळेगणसिद्धीसाठी मुंबईहून रवाना झाले.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धीमध्ये रविवारी अण्णांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरून संभाषण घडवून दिलं. लेखी आश्वासन देण्याची अण्णांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून, तसं पत्रच गिरीष महाजन आज अण्णांना सुपूर्द करणार आहेत. त्यामुळं अण्णा हजारे आज उपोषण सोडणार असल्याची दाट शक्यता आहे.

8 तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास, पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव अशा मागण्यांसाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील अण्णा हजारेंची भेट घेतली. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक मागण्यांसह अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू केलं.

अण्णा हजारे यांची माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनाविषयी चर्चा केली. तर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका! असं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलं. अण्णांचा लढा भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आहे. त्यामुळे अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी असं या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंनी लिहलं.

एकीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता. त्याबाबत अण्णा हजारे यांच्या वतीनं बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठविण्यात आली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. सुपे इथं करण्यात आलेल्या रास्तारोकोत ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

VIDEO : ...जेव्हा आदित्य ठाकरेंच्या मंचावर दोन कट्टर विरोधक एकत्र येतात

First published: February 4, 2019, 9:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading