शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार

शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी अण्णा हजारे मध्यस्थी करायला तयार

  • Share this:

02 जून : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता एक नवीन वळणं मिळालं आहे.   ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढच नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकारसोबत चर्चेला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण सोशल मीडियावर अण्णांच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त केली जातेय. अण्णा हजारे देवेंद्र सरकारचे एजंट असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातोय.

दुसरीकडे किसान क्रांतीचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी अण्णांच्या पाठिंब्याचं स्वागत केलं आहे. पण अण्णांनी अगोदर कर्जमुक्ती मिळवून द्यावी आणि नंतरच बोलावं असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी संपावर असलेले शेतकरी कुणाचीही मध्यस्थी स्वीकारण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतं आहे.

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी अण्णांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. .'शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असं अण्णांनी यात म्हटलं आहे. त्याचबरोबर,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे. ते चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 01:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading