नगरच्या दारुकांडात पोलिसांचा सहभाग - अण्णा हजारे

नगरच्या दारुकांडात पोलिसांचा सहभाग - अण्णा हजारे

पांगरमल दारुकांडाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही अण्णांनी केलीये.

  • Share this:

09 एप्रिल : अहमदनगरच्या पांगरमल दारुकांडात पोलिसांचाही समावेश असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केलाय. तसे पुरावेही त्यांच्याकडे असल्याचा दावा अण्णांनी केलाय. पांगरमल दारुकांडाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही अण्णांनी केलीये.

नगरमधील बनावट दारुचा कारखाना चालवला जातोय हे गंभीर असून याला पोलीस अधीक्षक आणि उत्पादन शुल्कचे अधीक्षक जबाबदार नाहीत का असा सवालही, त्यांनी उपस्थित केलाय. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही सीआयडी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती अण्णांनी दिलीये.

निवडणुकीच्या दरम्यान याच दारुकांडामुळे 20 जणांचा मृत्यू ओढावला होता.

First published: April 9, 2017, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading