अंकिता लोखंडेने सर्वांसमोर केलं बॉयफ्रेंडला किस, व्हिडीओ व्हायरल

विकीच्याआधी अंकिता अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती. दोघं अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 02:51 PM IST

अंकिता लोखंडेने सर्वांसमोर केलं बॉयफ्रेंडला किस, व्हिडीओ व्हायरल

मुंबई, २५ एप्रिल- ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अंकिता लोखंडेचा प्रियकरासोबतच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या प्रियकराला सर्वांसमोर किस करताना दिसत आहे. विकी जैन असं तिच्या प्रियकराचं नाव असून दोघं एका लग्नात नाचताना अंकिता त्याला किस करते. यात दोघांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री दिसते. हा व्हिडीओ नागिन मालिकेतील स्टार अर्जुन बिजलानीने शूट केला आहे.

Slow Motion Song- सलमान खानच्या भारत सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित, दिशा पटानीचे स्टंट पाहाच

‘स्पॉटबॉय’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अंकिता आपल्या प्रियकरासोबत विक्की जैनसोबत एका लग्नाला गेली होती. लग्नात दोघांनी धम्माल केली. व्हिडीओमध्ये हे कपल ढोलाच्या तालावर बेधूंद होऊन नाचताना दिसत आहे. याचवेळी अंकिता विकीला मिठी मारते आणि त्याला किस करते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.Loading...


 

View this post on Instagram
 

@lokhandeankita dancing with boyfriend Vicky at a wedding #ankitalokhande #vickyjain #arjunbijlani


A post shared by It's TV Time (@shiningbollywood) on

अनुष्का शर्मासमोरच जेव्हा विराट कोहली मरण्याचा अभिनय करतो...

अंकिता आणि विकी दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं जातं. अंकिताच्या वाढदिवसाच्या पार्टीतही विकी आला होता. दोघं एकत्र व्हेकेशनलाही जातात मात्र दोघांनी आतापर्यंत आपल्या नात्याला कबूली दिली नाही. दोघंही फक्त चांगले मित्र आहेत असंच ते सतत सांगतात. एका एण्टरटेनमेन्ट पोर्टलनुसार, अंकिता आणि विकी लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. विकीच्याआधी अंकिता अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती. दोघं अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

‘दबंग’गिरी भोवली, सलमान खानविरोधात तक्रार दाखल

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ’ झांसी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात तिने झलकारी बाईची व्यक्तिरेखा साकारली होती. सिनेमात कंगना रणौतची मुख्य भूमिका होती. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. अंकिताला झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा एवढी प्रसिद्ध झाली होती की तिला आजही त्याच भूमिकेमुळे अधिक ओळखलं जातं. या मालिकेशिवाय ‘एक थी नायिका’ आणि ‘झलक दिखलाजा’ या शोमध्येही ती दिसली होती.

Breaking- 19 तारखेच्या पूर्वी प्रदर्शित होणार नाही ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमा- निवडणूक आयोग

VIDEO: उर्मिला मातोंडकर यांचा उत्तर मुंबईत कसा सुरू आहे प्रचार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...