महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी अनिल देशमुखांची मोदी सरकारकडे मोठी मागणी

महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी अनिल देशमुखांची मोदी सरकारकडे मोठी मागणी

'पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे'

  • Share this:

मुंबई, 13 मे :  राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या 32 कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल  कार्य करत आहे. मात्र, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे.

पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली, असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत आणखी एका पोलिसाचा मृत्यू

दरम्यान,  अहोरात्र सेवा आणि आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवा आणि पोलीस दलालाही कोरोनाचा धोका भेडसावत आहे. कोरोनामुळे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवडी पोलीस स्टेशन इथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -आत्मनिर्भर म्हणजे, तुमचे तुम्ही पाहा; काँग्रेस नेत्यांची मोदींवर सडकून टीका

महाराष्ट्रात 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये सर्वाधिक 400 पोलीस हे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, नाशिक आणि पुणे येथे प्रत्येकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या