मुंबई, 11 ऑगस्ट: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशमुखांच्या विरोधात असलेल्या आरोपांच्या प्रकरणात ईडीनं (ED) चौकशीचा वेग वाढवला असल्याचं दिसून येत आहे. देशमुखांच्या चौकशीत ईडीच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खाजगी बँकांकडून (Private Bank) अनिल देशमुख यांनी नियमांचं उल्लंघन करत कर्ज (Loan) घेतल्याचं समजतंय.
त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करुन लोन पास करण्यासाठी देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, याचा तपास ईडी आता करत आहे. लोन म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी अशा कंपन्यांना ट्रान्सफर केली, ज्या कंपन्यांवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा हक्क आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
अमृतसरमध्ये शेतात कोसळलेला ड्रोन पाकिस्तानी? भारतीय हवाई दलानं दिली माहिती
पुढे ईडीच्या सुत्रांनी सांगितलं, तसंच ईडीनं या कंपन्यांची चौकशी केल्यावर अशी माहिती समोर आली आहे की, यातल्या काही कंपन्या खऱ्या तर काही शेल आहेत. त्यामुळे ईडी आता लोन घेतलेल्या पैशांचं काय केलं याची चौकशी करत आहे.
दरम्यान पोलिसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात होता, अशी कबुली आधीच सध्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला दिली आहे. इतकंच काय तर 4 मार्चला ज्ञानेश्वरी (अनिल देशमुखांचा मुंबईतील सरकारी बंगला) येथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतल्या बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी तक्रारीमध्ये केला होता. दरम्यान ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Nagpur