Android Q : या वर्षात तुमच्या स्मार्टफोनमध्ये होतील 'हे' 8 मोठे बदल

Android Q : या वर्षात तुमच्या स्मार्टफोनमध्ये होतील 'हे' 8 मोठे बदल

Android Q मध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी तुमची फोन वापरण्याची पद्धतच बदलून टाकतील

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मे : गुगलने Android Q ही नवी Android Operating System लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कोणते नवे बदल होतील हे सुद्धा गुगलने स्पष्ट केलं आहे. Android Q System मध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी तुमची फोन वापरण्याची पद्धतच बदलून टाकतील. तर जाणून घ्या Android Q मुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणते बदल होतील..

प्रायव्हसी फीचर आणि ऑप्शन्स - गुगल Android Q मध्ये प्रायव्हसी फीचर्सवर जास्त भर देण्यात आला आहे. यात कॅमरा, कॅलेंडर अशा गोष्टींना परमिशन देण्यासाठी डेडीकेटेड प्रायव्हसी सेक्शन मिळणार नाही.

अँड्रॉइड फोनसाठी फोकस मोड - ही सिस्टिम डेव्हलप करताना गुगलने युजर्सच्या आरोग्याचा विचार करत स्मार्टफोनचा वापर कसा कमी करता येईल यावर जास्त भर दिला आहे. Android Q मध्ये फोकस मोड राहणार आहे. जे अलर्ट्स आणि नोटिफिकेशन्सला ब्लॉक करेल. पण महत्त्वाच्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायला तितकाच चान्स देईल.

उत्तम नोटिफिकेशन मॅनेजमेंट - कोणतही अलर्ट आल्यानंतर त्यावर तुम्ही लॉन्ग प्रेस केलं तर 'show silently' किंवा 'keep alerting' सारखे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. त्यामुळे उत्तमप्रकारे तुम्ही नोटिफिकेशन मॅनेज करू शकाल.

लोकेशन शेयरिंग होणार प्रायव्हेट - Android Q मध्ये यूजर्सना अॅप वापरताना आपलं लोकेशन शेयर करायचं की नाही हे ऑप्शन मिळेल.

काढून टाकलेलं अॅप मिळवता येईल परत - अनेकदा चुकून एखादं अॅप आपल्याकडून डिलीट झालं तर Android Q मध्ये ते परत मिळविण्यासाठी काही सेकंद मिळतील ज्याद्वारे परत ते अॅप तुम्ही तुमच्या फोनमध्ये स्टोअर करू शकाल.

डार्क मोड - गुगल Android Q च्या सर्वच स्मार्टफोन्समध्ये सिस्टिम वाइड डार्क मोड रोलआउट करता येईल. म्हणजेच तुम्ही फक्त स्पेसिफिक अॅपलसाठीच नव्हे तर तुमचा पूर्ण फोनच डार्क मोडमध्ये टर्न करू शकाल.

Wifi शेयर करणं होईल आणखी सोपं - या ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोनमध्ये Wifi नेटवर्क क्यूआर कोडच्या माध्यमातून तुम्हाला शेयर करता येईल. तर दुसरं Wifi नेटवर्क जॉइन करण्यासाठी तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

स्क्रीनशॉट्स घेणं होणार आणखी सोपं - Google ने Android Q मध्ये स्क्रीनशॉट घेणं जास्त सोपं केलं आहे. अँड्रॉइडच्या या अपकमिंग व्हर्जनमध्ये स्क्रीनशॉटलासुद्धा नॉच सपोर्ट मिळेल.

First published: May 9, 2019, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading