Home /News /news /

गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं! दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं! दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

गॅस गळतीमुळे 3 किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला असून तातडीनं रिकामा केला आहे.

    विशाखापट्टणम, 07 मे : आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात LG पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे 10  जणांचा मृत्यू झाला असून 5000 हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे. तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर 200 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. हा गॅस जवळपास 3 किलोमीटरपर्यंत पसरत गेला. 5 गावं पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत. या गॅस गळतीचा फटका 9 गावांना बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य सेवा घटनास्थळी पोहोचली होती. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान 5000 टनचे दोन टँक लिक झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मार्चपासूनच ही इमारत बंद असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आत केमिकल रिअॅक्शन झाली असावी आणि त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी यापरिसरासोबत 5 गावं पूर्णपणे सील केला आहे. दरम्यान गॅस वेगानं पसरत असल्यानं 3 किलोमीटरपर्यंत परिसरात राहणाऱ्या लोकांना त्रास झाला आहे. ही गॅस गळती कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. कोरोनाचं संकट असताना आता गॅस गळतीच्या या दुर्घटनेमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Visakhapatnam, Visakhapatnam S01p04, Vishakhapattam

    पुढील बातम्या