अंधेरीत एसव्ही रोडवरील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग

अंधेरीत एसव्ही रोडवरील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग

अंधेरी पश्चिम भागातल्या एस. व्ही. रोड येथील शिफा टिंबर्स आणि वेस्टर्न टिंबर्सला मोठी आग लागलीय. या भागात लाकडाच्या वखारी आहेत तसंच या दुकानांच्या पाठीमागेच वेस्टर्न रेल्वेची लाईन आहे. त्यामुळे आगीची गांभिरता आणखीच वाढलीय.

  • Share this:

09 जानेवारी, मुंबई : अंधेरी पश्चिम भागातल्या एस. व्ही. रोड येथील शिफा टिंबर्स आणि वेस्टर्न टिंबर्सला मोठी आग लागलीय. या भागात लाकडाच्या वखारी आहेत तसंच या दुकानांच्या पाठीमागेच वेस्टर्न रेल्वेची लाईन आहे. त्यामुळे आगीची गांभिरता आणखीच वाढलीय. फायर ब्रिगेडने ही आग विझवण्यासाठी तातडीने तीन टँकर्स पाठवले घटनास्थळी पाठवलेत. पण ही सगळी वाहनं ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याची माहिती मिळत होती. तुर्तास स्थानिकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच या आगीचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय.

मुंबईतील गेल्या दोन आठवड्यातली ही आगीची आणखी एक मोठी घटना आहे. गेल्या महिन्यांच्या शेवटी देखील कमला मिलमधील मोजोस आणि वन अबव्हू या दोन हॉटेल्सला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तसंच काल परवाही मुंबईत आगीच्या एक दोन घटना घटना घडल्या होत्या. अशातच एस. व्ही. रोडच्या टिंबर मार्केटमध्ये आग लागल्याने बीएमसीची चिंता आणखी वाढलीय.

First published: January 9, 2018, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading