मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन

27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधन

मुंबई, 30 जुलै : अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या मनोज मेहता यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. 27 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज रविवारी सायंकाळी संपली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. राजेश बिल्डर्स या कंपनीद्वारे त्यांनी पालघर, बोईसरमध्ये गृहसंकुलांची उभारणी केली होती.

आरक्षणासाठी बैठकींचं सत्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका

मनोज मेहता हे विले पार्ले येथे राहणारे होते. 3 जुलै रोजी नेहमीप्रमाणे अंधेरी-डहाणू रोड लोकल पकडण्यासाठी आलेले मनोज मेहता दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. अंधेरी पूल दुर्घटनेतील हा दुसरा बळी आहे. यात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचे निधन झाले होते.

मराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाक

सध्या मेहता यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घरातला करता पुरूष गेल्याने सगळ्यांना अश्रू अनावर झालेत. नानावटी रुग्णालयात मनोज मेहता यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा अपघातांत अनेकांनी आपले प्राण गमावले पण तरी दुर्घटना काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे आणखी किती बळी जाणार आणि खरंतर या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा...

VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी

डीएमकेचे प्रमुख एम.करूणानिधी यांची प्रकृती अत्यवस्थ

प्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन

First published:

Tags: Adheri bridge, Death, Gokhale bridge collapse, Manoj mehta, Mumbai latest