सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी ?

सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी ?

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सुखद घटना असो किंवा एखादी दुख:द घटना सोशल मीडियावरील कुणाचीही खिल्ली उडवण्यास मागे पुढे पाहिलं जात नाही. आज मुंबईतील अंधेरीतील पूल दुर्घटनेत जखमींबाबत सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली.

आज सकाळी अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पुलाचा भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यात पाच जण जखमी झाले होते.

जखमी झालेल्यापैकी एका व्यक्तीचा चेहरा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीशी मिळता जुळता आहे. मग काय सोशल मीडियावर अंधेरी पूल दुर्घटनेत धोणी जखमी म्हणून अशी बोंब ठोकली गेली. आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू धोणी अंधेरीतील दुर्घटनेस्थळी कसा येऊ शकतो म्हणून लोकंही फोटो पाहुन हैराण झाले. एवढंच नाहीतर काही गंमतशीर जोकही या घटनेच्या निमित्ताने दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाले.

----------------------------------

1. अंधेरी ईस्ट वेस्ट ब्रिज कोसळला.

2.कमला मिल ला आग लागली

3.चर्नीरोड़ स्टेशन जवळ आग लागली

4. मीरा रोड स्टेशन तिकीट घर का आग लागली

5.सांताक्रूज हायवे बेस्ट बस अकॅसिडेन्ट

आज मुंबईवर संकट

कोणीतरी रविवारी संकष्टीला मटण खालेलं आहे

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

काय करू तरी काय, रस्त्यावरिल गाड्या बघु , आजूबाजूचे झाड बघू,वरती विमान बघु की, पाया खालचे ब्रिज हलवून बघु एक त्रस्त मुंबईकर

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्टेशन अनाउन्समेंट:

यात्रियों से निवेदन हे की एक प्लाट्फ़ोर्म से दूसरे प्लाट्फ़ोर्म जाने के लिए पटरियाँ क्रॉस करे, फूट ओवर ब्रिजेस कभी भी गिर सकते हे,

रेल मंत्रालय द्वारा जनहित में जारी।

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

अंधेरी स्टे. चा पूल कोसळला , आता पुढचा एक महिना....

मुंबई म.न.पा.:- ही रेल्वे ची जबाबदारी

पश्चिम रेल्वे :- ही मुंबई म.न.पा. ची  जबाबदारी

सत्ताधारी पक्ष :- आम्ही सर्व पुलाचे ऑडीट करून तपास करू

विरोधक पक्ष:-  सत्ताधारी पक्षाने यांची जबाबदारी घेऊन , राजीनामा द्यावा

सामान्य मुंबई कर :- चला कामाला " रात गयी , बात गयी "

न्युज चॅनल :-  This is Mumbai sprit

या नंतर आपली Indain Army  मेहनती ने तो पूल परत बांधणार

आणि मग ....

सत्ताधारी पक्ष :-  पुलाचे उद्धाटन आमचे नेते करणार ...

 

विरोधक पक्ष:- पुलाचे उद्धाटन आमचे नेते करणार ...

Indian army..back to work at border

मुंबईकर :-  चला कामाला , हे नेहमीच आहे

-✒

First published: July 3, 2018, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading