मुंबई, 24 डिसेंबर : सोशल मीडियावर अनेक जुगाड व्हायरल होत असतात कधी मजेशीर तर कधी विचार करायला लावणारे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात तर असे भन्नाट जुगाड व्हायरल झाले होते. असाच एक अजब गोलमाल समोर आला आहे. अॅम्बॅसिडर कारची बैलगाडी केल्याचा हा अजब जुगाड सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्र कंपनीचे CEO आनंद महिंद्र यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
हा व्हिडीओ दक्षिण भारतातील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की अॅम्बॅसिडर कारची बैलगाडी केली आहे. कारचा पुढचं बोनेट आणि भाग काढून तिथे बैल जुंपले आहेत. तर मागच्या भागावर टांग्यासारखी गाडी तशीच ठेवली आहे. सोशल मीडियावर या जुगाडाचं कौतुक देखील केलं जात आहे.
I don’t think @elonmusk & Tesla can match the low cost of this renewable energy-fuelled car. Not sure about the emissions level, though, if you take methane into account... pic.twitter.com/C7QzbEOGys
'मला वाटत नाही की नूतनीकरणक्षम उर्जेने चालणार्या या भारतीय कारशी एलोन मस्क आणि टेस्ला स्पर्धा करू शकतात.' असं कॅप्शन देऊन आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
328 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 23 डिसेंबर रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्याला 23 हजारहून अधिक लाइक्स आणि 3 हजारहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. अनेक लोकांनी या या जुगाडाचं तोंडभरून कौतुक देखील केलं आहे. तर एका युझरनं हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचा दावा देखील केला आहे.