'जख्मी जूतों का हस्पताल'ला आनंद महिंद्रांचं नवजीवन

'जख्मी जूतों का हस्पताल'ला आनंद महिंद्रांचं नवजीवन

  • Share this:

मुंबई,ता.1,ऑगस्ट : सोशल मीडियामुळे कधी कुणाचं जीवन बदलेल काहीच सांगता येत नाही. महिंद्र अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एका चप्पल बनविणाऱ्या कारागिरासाठी एक सुंदर पोर्टेबल दुकान खास डिझाईन करून तयार केलंय. त्याचा व्हिडीओ त्यांनी आज टट्विट केला. या नव्या दुकानामुळे नरसीराम या कारागिराचं आयुष्यचं बदलून जाणार आहे. महिंद्रा हे ट्विटरवर अतिशय सक्रिय असतात. अनेक सकारात्मक गोष्टींची माहिती ते ट्विटरवरून देत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी चप्पल बनविणाऱ्या एका कारागिराचा फोटो ट्विट केला. त्या कारागिराच्या दुकानाचं नाव होतं 'जख्मी जूतों का हस्पताल' या नावानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या दुकानातल्या पाटीवर लिहिलं होतं ओपीडी सकाळी 9 ते 11, लंच टाईम दुपारी 1 ते 2, संध्याकाळी 2 ते 6. त्याच्या या कल्पकतेचं महिंद्रांना कौतुक वाटलं.

पैसे नाहीयेत, तरीही बुक करू शकता ऑनलाइन तिकीट

SBI ची चेतावणी! बँक अकाऊंटमधून होत आहे नव्या पद्धतीने चोरी

अशा व्यक्तिंना आयआयएममध्ये शिकायला पाठवलं पाहिजे असं ट्विट करत त्याचा पत्ता कुणाला माहित असेल तर सांगा. या व्यक्तिला मला मदत करायची आहे असं ट्विट त्यांनी केलं होतं. नंतर तो कारागीर हरियाणातला असल्याचं स्पष्ट झालं. नरसीराम असं त्या कारागीराचं नाव असून रस्त्याच्या बाजूला त्याचं हे छोटसं दुकान आहे.

गणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन

पाकिस्तानात पहिल्यांदाच तीन हिंदू उमेदवार विजयी

महिंद्राच्या टीमने त्यांची भेट घेतली आणि काय मदत पाहिजे असं विचारलं. तेव्हा पैशाची मागणी न करता नरसिराम यांनी एक चांगलं दुकान तयार करून द्या अशी विनंती केली. त्यानंतर महिंद्राच्या डिझाईन टिमने नरसिराम यांच्यासाठी एक खास छोटेखानी दुकान तयार केलं.

ते दुकान आत नरसीराम यांना देण्यात येणार आहे. त्या दुकानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलाय. नेटकऱ्यांनीही नरसीराम यांच्या या नव्या हॉस्पीटलंच कौतुक केलं असून महिंद्रांच्या कल्पकतेलाही सलाम केला आहे.

First published: August 1, 2018, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading