मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ना दंड, ना पावती, सिग्नल मोडला तर डायरेक्ट गोळ्या ! काबुलच्या चौकातील रायफलधारी ट्रॅफिक पोलिसाचा VIDEO

ना दंड, ना पावती, सिग्नल मोडला तर डायरेक्ट गोळ्या ! काबुलच्या चौकातील रायफलधारी ट्रॅफिक पोलिसाचा VIDEO

काबूलच्या रस्त्यावर हातात बंदूक घेऊन ट्रॅफिक कंट्रोलचं (Traffic Control) काम एक तालिबानी करत असल्याचा व्हिडिओ (Video) एका आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे.

काबूलच्या रस्त्यावर हातात बंदूक घेऊन ट्रॅफिक कंट्रोलचं (Traffic Control) काम एक तालिबानी करत असल्याचा व्हिडिओ (Video) एका आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे.

काबूलच्या रस्त्यावर हातात बंदूक घेऊन ट्रॅफिक कंट्रोलचं (Traffic Control) काम एक तालिबानी करत असल्याचा व्हिडिओ (Video) एका आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर काबूलसह (Kabul) देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानी सध्या विजयाच्या उन्मादात असून वाटेल त्या गोष्टी करत असल्याचं चित्र दिसत आहे. अफगाणिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून सर्वत्र अफरातफर माजली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात काबूलच्या रस्त्यावर हातात बंदूक घेऊन ट्रॅफिक कंट्रोलचं (Traffic Control) काम एक तालिबानी करत असल्याचा व्हिडिओ (Video) एका आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे. त्यामुळे आता ना पावती, ना दंड असं चित्र असून ट्रॅफिकचे नियम मोडले, तर थेट गोळ्या खाव्या लागतील, असं  चित्र आहे.

काबूलच्या रस्त्यांवर सध्या अफगाणिस्तानमधील पोलिसांऐवजी तालिबानीच ट्रॅफिक कंट्रोलचं काम करत असल्याचं चित्र आहे. मानेला बंदूक अडकवलेला आणि मान उजवीकडे आणि  डावीकडे  फिरवत वाहतुकीचा अंदाज घेणारा एका तालिबानी या व्हिडिओत दिसत आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओखाली त्यांनी एक कॅप्शनदेखील लिहिलं आहे. गलती का कोई स्कोप नही, असं लिहिलेलं हे विनोदी कॅप्शनला सध्या नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत आहे.

तालिबान्यांचा मनमानीपणा

काबूलमध्ये ताबा मिळवल्यानंतर तालिबानी मनाला वाटेल, तिकडे स्वैर संचार करत असल्याचं चित्र आहे. कधी ते राष्ट्रपती भवनाच्या जिममध्ये व्यायाम करताना दिसतायत, तर कधी बागेतल्या झोक्यावर बसलेले दिसत आहेत. आता ते ट्रॅफिक कंट्रोलचं पण काम करत असल्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

काबूलमध्ये सध्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत असून परदेशी नागरिक देश सोडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिक विमानतळाकडे धाव घेत असल्यामुळे विमानतळाबाहेरच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र आहे

First published: