अमृता फडणवीसांना राहुल गांधींसारखीच 'शिक्षा', विरोधकांकडून पिंपरी चिंचवडमध्ये वातावरण पेटणार

अमृता फडणवीसांना राहुल गांधींसारखीच 'शिक्षा', विरोधकांकडून पिंपरी चिंचवडमध्ये वातावरण पेटणार

खंरतर रेप इन इंडियाबाबत वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधातही भाजपने पुण्यात फोटोलो जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करणार आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 23 डिसेंबर :  अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी बोचरी टीका केली होती. त्यावरून शिवसेनेही त्यांच्यावर पलटवार करत खडे बोल सुनावले होते. पण यावरून पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना चांगलीच तापली आहे. अमृता फडणवीस यांच्या फोटोलो जोडो मारो आंदोलन करत शिवसेना महिला आघाडीतील पदाधिका-यांनी आंदोलन केलं आहे. तर अशा टीका थांबवा अन्यथा घरात घुसून मारू अशा शब्दात शिवसेनेकडून धमकी देण्यात आली आहे.

खंरतर रेप इन इंडियाबाबत वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधातही भाजपने पुण्यात फोटोलो जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेनंही अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करणार आहे. कधी नव्हे ते अमृता फडणवीसांनी अतिशय आक्रमकपणे टीका केल्याने राजकीय चर्चेला वेगळी सुरुवात झाली होती. आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खुलासा केलाय. अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती.

इतर बातम्या - 10 वर्षांनी महाराष्ट्रात दिसणार 'फायर रिंग'! कुठे आणि कधी पाहता येणार?

त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. या आधीही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आत्तापर्यंत अमृता फडणवीस या फक्त सामाजिक बाबींवरच ट्वीट करत असत. आता मात्र त्या थेटपणे राजकीय विषयांवर टीका करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं राहूल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यावर आता आठ दिवसांनी अमृता फडणवीस यांनी ट्विटरूवरून प्रतिक्रिया देत हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.

इतर बातम्या - 23व्या वर्षीच कमवतो 89 लाख, हे काम शिकण्यासाठी तुम्ही कोणाची वाट पाहताय?

फडणवीसांना लवकरच कंठ फुटला, शरद पवारांची सडकून टीका

अमृता फडणवीस टीका करतात त्याबद्दल काय वाटतं असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना पुण्यात विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देत अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांनी काय करावं आणि करू नये हे मी त्यांना सांगत नाही. आणि सांगूनही त्या ऐकतीलच असं नाही असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

इतर बातम्या - मुंबई हादरली! मुक्या आई-वडिलांचं 6 महिन्याचं लेकरू शेजाऱ्यांनी परस्पर विकलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 09:16 PM IST

ताज्या बातम्या