लोकांनी ट्रॅकवरून दूर व्हावं अशी 10 वेळा घोषणा केली होती - आयोजकाचा दावा

'आम्ही किमान दहा वेळा लाऊडस्पीकरवरून लोकांनी ट्रॅकवर उभं राहू नये अशी घोषणा केली होती.'

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2018 09:27 PM IST

लोकांनी ट्रॅकवरून दूर व्हावं अशी 10 वेळा घोषणा केली होती - आयोजकाचा दावा

अमृतसर, ता.22 ऑक्टोबर : रावण दहन कार्यक्रमावेळी लोकांनी ट्रॅकवर उभ राहू नये असं आवाहन अनेकदा केलं गेलं होतं असा दावा या कार्यक्रमाचे आयोजक सौरभ मदान यांनी केलंय. एका अज्ञात स्थळावरून त्यांनी हा व्हिडीओ केलाय. त्यात ते म्हणतात मी या घटनेनं अत्यंत दु:खी आहे. लोकांनी एकत्र यावं यासाठीच आम्ही हा कार्यक्रम करत असतो. पंजाबीमध्ये त्यांचा हा व्हिडीओ आहे.

कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आम्ही घेतल्या होत्या. कार्यक्रमस्थळी फायरब्रिगेडची गाडी, 100 पोलीस तैनात होते. रावणाच्या पुतळ्याभोवती 20 फुट जागा मोकळीही ठेवण्यात आली होती. आम्ही किमान दहा वेळा लाऊडस्पीकरवरून लोकांनी ट्रॅकवर उभं राहू नये अशी घोषणा केली होती. पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी ऐकलं असतं तर घटना टळली असती.

मदान यांच्या घरी काही लोकांनी हल्ला केला होता. त्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय सध्या अज्ञात स्थळी आहेत. या आधी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात स्टेशवरून असं सांगण्यात येत होतं की गर्दी एवढी आहे की ट्रॅकवरून 500 गाड्या गेल्या तरी लोक हटणार नाहीत.

मैदानाच्या शेजारी रेल्वे ट्रॅक असल्यामुळं आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही असा आरोप होतोय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2018 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close