खासदार नवनीत राणा यांनी पतीचे घरीच कापले केस, फेसबुकवर VIDEO केला शेअर

खासदार नवनीत राणा यांनी पतीचे घरीच कापले केस, फेसबुकवर VIDEO केला शेअर

अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांचे घरीच केस कापले आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवरून शेअर केला आहे.

  • Share this:

अमरावती, 29 मे : राज्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. या संसर्गाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक सलून बंद आहेत. अशात अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांचे घरीच केस कापले आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवरून शेअर केला आहे.

कर्तन करून आत्मनिर्भर होण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे असं नवनीत राणा यांनी त्यांच्या फेबसुक पोस्टवर म्हटलं आहे. आमदार पतीचे केस कर्तन करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. खरंतर लॉकडाऊनमुळे अनेकांनी घरीच केस कापले आहेत. असाच प्रयत्न नवनीत राणा यांनी केला आहे.

मी माझ्या पतीला बऱ्याच वेळ केस कापण्यासाठी सांगितलं, पण बाहेर सगळी दुकानं बंद असल्यामुळे आता मीच त्यांचे केस कापणार असल्याचं नवणीत राणा या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. इतकंच नाहीतर 'मी पतीचे केस कापण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते केस कापल्यानंतर बैठकांसाठी जाऊ शकतात की नाही हे आपण पाहूया' असंही त्या गंमतीने म्हणाल्या.

दरम्यान, या व्हिडिओवर अनेक समर्थकांनी कमेंट्स केल्या आहेत. आणि आपलं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर शेअर करणं चांगलं असल्याच्या कमेंट्सही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

First published: May 29, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या