विमान कारखान्यासाठी अमोल यादवला पालघरमध्ये जागा मिळणार

विमान कारखान्यासाठी अमोल यादवला पालघरमध्ये जागा मिळणार

कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा अखेर मोकळा झालाय. राज्य सरकारने त्यांना पालघर एमआयडीसीत स्वतःचा विमान कारखाना काढण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलीय.

  • Share this:

 19 फेब्रुवारी, मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा अखेर मोकळा झालाय. राज्य सरकारने त्यांना पालघर एमआयडीसीत स्वतःचा विमान कारखाना काढण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलीय.

यासंदर्भात राज्य सरकार आणि कॅप्टन अमोल यादव यांच्यात 35 हजार कोटींचा करारही झालाय. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार झालाय. त्यामुळे अमोल यादव यांची अखेर प्रतीक्षा संपलीय. आता राज्य सरकारने लवकरात लवकरच मला जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून पहिलं भारतीय बनावटीचं विमान मला बनवता येईल. अशी अपेक्षा अमोल यादव यांनी व्यक्त केलीय.

अमोल यादव यांचा भारतातील हा पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असणार आहे, जो महाराष्ट्रातील पालघर एमआयडीसीत सुरु होतोय. गेल्या 20 नोव्हेंबर रोजीच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचं पत्र देण्यात आलं होतं.

अमोल यादव यांनी मुंबईतील चारकोपमधल्या स्वतःच्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन पहिल भारतीय बनावटीचं विमान तयार केलंय. पण केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्याने अमोल यादव यांचं स्वप्न इतके वर्ष रखडलं होतं. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर अमोल यादव यांच्या स्वदेशी विमानाचा मार्ग मोकळा झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2018 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...