'मनात उमटलं ते व्यासपीठावर नाही तर कुठे मांडायचं', अमोल पालेकरांचा संताप

'मनात उमटलं ते व्यासपीठावर नाही तर कुठे मांडायचं', अमोल पालेकरांचा संताप

सरकारवर टीकामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण थांबवण्याचा प्रकार समोर आला होता.

  • Share this:

पुणे, 10 फेब्रुवारी : 'मी सेन्सॉरशिप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दल बोलतोय. जे प्रश्न मनात उमटले ते या मंचावर नाही मांडायचं तर कुठं मांडायचं?' असं म्हणत अमोल पालेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारवर टीकामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण थांबवण्याचा प्रकार समोर आला होता.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथं बोलताना अमोल पालेकर यांनी सरकारच्या काही निर्णायांवर टीका केली. त्यानंतर त्यांचं भाषण थांबवण्यात आलं. आता पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत पालेकरांनी पली भूमिका मांडली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर कोणत्या मुद्द्यांवर आणि का टीका केली, याबाबत आपली बाजू मांडली आहे.

काय म्हणाले पालेकर?

-मी सेन्सॉरशिप ,अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतोय

-NGMA ही गव्हर्नमेंट गॅलरी असे डायरेक्टर म्हणाले. पण गव्हर्नमेंट गॅलरी ही करदात्यांच्या पैशातूनच उभी केली जाते मग आवाज उठवण्यात गैर काय?

- मेहली आणि सुधीर पटवर्धन यांच्या कालाकृतींची प्रदर्शने रद्द केली

यापुढे फक्त वरच्या मजल्यावर म्हणजेच 5 व्या मजल्यावरच प्रदर्शन भरवले जाणार

पहिले 4 मजले वापरता येणार नाहीत, हा नवीन डायरेक्टरचा निर्णय धक्कादायक

फक्त NGMA चं कलेक्शन चार मजल्यांवर आणि बाहेरच्या कलाकृती करता फक्त एक मजला असे का, याबाबत मी वाचा फोडली

काय आहे नेमकं प्रकरण?

सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना टीका करण्यापासून रोखलं. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले आणि भाषण लवकर संपवण्यास सांगितलं.

Special Report : आता पोलीस सायकलवरुन करतील चोरांचा पाठलाग

First published: February 10, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading