S M L

दाभोलकर हत्या प्रकरणात अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Updated On: Sep 6, 2018 02:30 PM IST

दाभोलकर हत्या प्रकरणात अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे, 06 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात सीबीआय अमोल काळेच्या पोलीस कोठडीचा गैरवापर करतेय अशी माहिती आरोपी अमोल काळे याच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. तर पुढच्या तपासासाठी अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत कोल्हापूर एसआयटीने अंदुरेची चौकशी केली. अमोल काळेच्या चौकशीसाठी सीबीआय यापूर्वीच बेंगलोरला जाऊन चौकशी करून आली आहे. त्यामुळे अमोल काळेच्या कोठडीचा सीबीआय पोलीस गैरवापर करतंय असा आरोप अमोल काळेच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी अमोल काळेचा ताबा सीबीआयनं घेतला आहे. बंगळुरूमधून त्याला पुण्यात आणण्यात आलं, आणि काही वेळापू्वीच त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टांनं अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चौकशी दरम्यान अमोल काळेच्या डायरीमधून कर्नाटक एसआयटीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. आणखी 4 जणांचा हत्येचा कट रचला जात होता, आणि या चार जणांची नावं काळेच्या डायरीत सापडली आहेत. गिरीश कर्नाड, के. एस. भगवान, नरेंद्र नायक आणि चमकल स्वामी यांची नावं या डायरीत होती. 'एक ही दिन 4 अधर्मियों का विनाश' असा उल्लेख या डायरीत केला होता.

 

Loading...
Loading...

राम कदम यांच्यावर 'ट्रोल धाड' : सोशल मीडियावर 'बेटी भगाओ' व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2018 02:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close