'झुंड'मध्ये फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणाक 'बीग बी', आर्ची- परश्याही दिसणार

नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन असलेला हा पहिला हिंदी सिनेमा आहे. या सिनेमात बिग बी एका फुटबॉल कोचची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 05:27 PM IST

'झुंड'मध्ये फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणाक 'बीग बी', आर्ची- परश्याही दिसणार

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमा येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सैराट सिनेमातील प्रसिद्ध जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरही दिसणार आहेत.

बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतेच या सिनेमाचं चित्रीकरण संपवलं. झुंडचं अधिकतर चित्रीकरण नागपुरात पार पडलं. नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन असलेला हा पहिला हिंदी सिनेमा आहे. या सिनेमात बिग बी एका फुटबॉल कोचची व्यक्तिरेखा साकारत आहेत.या वर्षी २० सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सैराट सिनेमाने फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही वेड लावलं. आता अनेक वर्षांनी रिंकू आणि आकाशची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिनेमात दोघंही फुटबॉल संघाचे कर्णधार असणार आहेत. तर त्यांचे प्रशिक्षक अमिताभ बच्चन असणार आहेत. अमिताभ बच्चनसाठी हे वर्ष फार खास आहे. यावर्षी त्यांचे झुंड, बदला, ब्रम्हास्त्र हे तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सध्या अमिताभ हे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत चित्रीकरणात व्यग्र आहेत.

Loading...

VIDEO : शिवरायांची भव्यदिव्य रांगोळी साकारणाऱ्या सौंदर्यासाठी आई-वडिलांनी दागिने ठेवले गहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2019 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...