बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं कधीही चांगलंच- अमित शहा

बेरोजगार राहण्यापेक्षा युवकांनी भज्यांचा गाडा चालवणं कधीही चांगलं असं सांगत, अमित शहांनी पंतप्रधानांच्या त्या विधानाचं जाहीर समर्थन केलंय. पंतप्रधानांनी मध्यंतरी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोजगारासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना भजी विकणं हा देखील एक रोजगार निर्माणच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर काँग्रेसने सडकून टीका केली होती.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2018 07:27 PM IST

बेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं कधीही चांगलंच- अमित शहा

05 फेब्रुवारी, नवी दिल्ली : बेरोजगार राहण्यापेक्षा युवकांनी भज्यांचा गाडा चालवणं कधीही चांगलं असं सांगत, अमित शहांनी पंतप्रधानांच्या त्या विधानाचं जाहीर समर्थन केलंय. पंतप्रधानांनी मध्यंतरी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोजगारासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना भजी विकणं हा देखील एक रोजगार निर्माणच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर काँग्रेसने सडकून टीका केली होती. एवढंच नाहीतर 'एनएसयुआय'ने रस्त्यांवर भजी विकून पंतप्रधानांच्या त्या विधानाचा जाहीर निषेधही नोंदवला होता. पण भाजपने आता नेमका तोच मुद्दा उचलून धरत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय.

राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहांनी जीएसटीपासून ते पकोड्यांपर्यंत अशा सर्वच मुद्यांवर सविस्तर भाषण करून सरकारच्या धोरणांचं जोरदार समर्थन केलं. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसचे वाचाळवीर मणीशंकर अय्यर यांनी मोदींना चहावाला म्हणून हिनवलं होतं. त्यावर भाजपने नेमका तोच मुद्दा मोठा करून काँग्रेसने देशभरातील चहावाल्यांचा अपमान केल्याची भावनिक साद घालत गोरगरिबांना आपलसं केलं होतं. आताही भाजपने भजीवाल्यांचा मुद्दा मोठा करून सामान्य मतदारांना पुन्हा आपलसं करण्याचा प्रयत्न चालवलाय.

हा देश एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकतो तर भविष्यात हाच देश एका भजीवाल्यालाही का पंतप्रधान बनवणार नाही. असा सवाल उपस्थित करून भाजपने काँग्रेसवर पलटवार केलाय. भजी विकण्यात अजिबात कमीपणा नसल्याचं अमित शहांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close