अमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं!

अमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं!

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज नागपूरात येवून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

  • Share this:

नागपूर,ता.25 एप्रिल: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज नागपूरात येवून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

सव्वाबाराच्या सुमारात अमित शहा संघ मुख्यालयात दाखल झाले. सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशीही यांनाही ते भेटले. या भेटी आणि चर्चा तब्बल चार तास सुरू होत्या. शहा जेव्हा मुख्यालयात आले त्यावेळी उमा भारतीही संघमुख्यालयातच होत्या.

विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णु कोकजे यांनीही आज सरसंघचालकांची भेट घेऊन चर्चा केली. नंतर त्यांनी दिक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींनाही अभिवादन केलं.

First published: April 25, 2018, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading