गुजरातमध्ये भाजप 150 जागा जिंकेल- अमित शहा

राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांनी भाजपविरोधात कितीही रान उठवलं तरीही गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही 150 जागा जिंकूच, असा दावा अमित शहांनी केलीय. ते न्यूज 18च्या #AgendaGujarat या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2017 10:29 PM IST

गुजरातमध्ये भाजप 150 जागा जिंकेल- अमित शहा

14 नोव्हेंबर, गांधीनगर : राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांनी भाजपविरोधात कितीही रान उठवलं तरीही गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही 150 जागा जिंकूच, असा दावा अमित शहांनी केलीय. ते न्यूज 18च्या #AgendaGujarat या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

गुजरातमध्ये सध्या भाजपची 22 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांनी दोघांनी जोरदार रान पेटवलंय. यापार्श्वभूमीवर 'इंडिया न्यूज18'ने #AgendaGujarat या विशेष कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना बोलतं केलं. त्यांनी सडेतोड प्रश्नांना बेधडक उत्तरं देत गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला. तसंच विकासाच्या मुद्यावर आपण राहुल गांधीशी कुठेही आणि कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचं खुलं आव्हान दिलं. तसंच काँग्रेसला फक्त निवडणुकीच्या काळातच सरदार पटेलांची आठवण येते, असा आरोप केला.

गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपला आव्हान देणारे युवा नेता हार्दिक पटेलवरही खरपूस टीका केली. हार्दिक पटेलचा डीएनए सरदार पटेलांशी जुळतो, असं म्हणणं हाच पटेलांचा सर्वात अपमान असल्याचं अमित शहांनी म्हटलंय. राहुल गांधी आत्ता कुठे गुजरातमध्ये फिरताहेत. पण त्यांना पडणारी सत्तेची स्वप्नं कधीही पूर्ण होणार नाहीत, असंही अमित शहा म्हणाले.

गुजरातमध्ये काँग्रेसने अगोदर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, मग आमच्याशी लढावं, गेली 22 वर्षे आम्हीच गुजरातचा विकास करतोय त्यामुळे गुजरातमध्ये विकास वेडा झाला, हीच घोषणा काँग्रेसला निवडणुकीत महागात पडणार आहे. असंही अमित शहा म्हणाले. नोटबंदी आणि जीएसटीचा गुजरातच्या निवडणूक निकालांवर कोणताही विपरित परिणाम होणार नसल्याचा दावाही अमित शहांनी केलाय. राहुल गांधी कोणताही व्यवसाय करत नाही, त्यामुळे त्यांनी जीएसटीवर बोलू नये, असा टोलाही अमित शहा यांनी यावेळी यानिमित्ताने लगावला. या निवडणुकीतही गुजरातचा विकास हाच आमचा अंजेडा असल्याचं अमित शहा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...