अमित शहा लतादीदी आणि माधुरीचीही घेणार भेट

अमित शहा लतादीदी आणि माधुरीचीही घेणार भेट

  • Share this:

मुंबई,05 जून :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वाची आहे. पण मातोश्री भेटी व्यतिरिक्त अमित शहा हे उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहे.

अमित शहा यांचा असा आहे दौरा...

12 वाजता - मुंबई विमानतळ येथे आगमन

12:30 वाजता - आशिष शेलार ह्यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.

1 वाजता -  रंगशारदा येथे रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक ह्यांच्याशी चर्चा

3:30 वाजता - अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट

4:30 वाजता - लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट

5:30 वाजता - रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट

7:30 वाजता -  मातोश्री येथे उद्धव ठाकरे ह्यांची भेट

9 वाजता - सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक

10:30 वाजता - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्या सोबत चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 11:39 PM IST

ताज्या बातम्या