मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

...तर कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

...तर कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

आज लॉकडाऊन संपेल या आशेने मुंबईमध्ये राहणारे हजारो परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी वांद्रे पश्चिम याठिकाणी स्थानकात आले होते.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली 14 एप्रिल: वांद्र्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे ही काळजीचं कारण आहे. अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्या. अशा घटनांमुळे भारताची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं. या प्रकरणावर आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वांद्रे इथे कोरोनाचा टाइम बॉम्ब! आज लॉकडाऊन संपेल या आशेने मुंबईमध्ये राहणारे हजारो परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी वांद्रे पश्चिम याठिकाणी स्थानकात आले होते. लॉकडाऊन वाढवल्यामुळे या मजुरांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मजुरांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन सर्वजण करत असताना एवढी गर्दी एका ठिकणी होणं हे मुंबईसमोर मोठं संकट ठरू शकते.
First published:

पुढील बातम्या