S M L

'त्या' दिवशी कोडनानी रुग्णालयात होत्या -अमित शहा

2002 मधल्या नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आज कोर्टात साक्ष झाली

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2017 05:03 PM IST

'त्या' दिवशी कोडनानी रुग्णालयात होत्या -अमित शहा

18 सप्टेंबर : 2002 मधल्या नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आज कोर्टात साक्ष झाली. भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी यांच्या बाजूनं अमित शहा यांची साक्ष झाली.

कोडनानी या प्रकरणात आरोपी आहेत. पण दंगल झाली तेव्हा आपण सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो आणि अमित शहासुद्धा आपल्या सोबतच होते, असा दावा कोडनानी यांनी केलाय. दंगल झाली त्या दिवशी कोडनानी नरोडा पाटियाला गेल्या नव्हत्या, असंही अमित शहा यांनीही साक्षीत सांगितलंय.

काय आहे नरोडा पाटिया प्रकरण?

- 2002च्या गुजरात दंगली दरम्यान नरोदा पाटिया इथं हत्याकांड

- 11 मुसलमानांची हत्या करण्यात आली होती

Loading...

- माया कोडनानी यांनी जमावाला भडकावल्याचा आरोप

- या प्रकरणी माया कोडनानींसह 82 जणांवर आरोप

- माया कोडनानींसह 31 जण दोषी

- कोडनानी यांना २८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय

- प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोडनानी यांना जामीन देण्यात आलाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 05:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close